Jalgaon News : जामनेरच्या 8 खेळाडूंचा स्केटिंग स्पर्धेत विश्वविक्रम; ‘गीनिज बुक’मध्ये नोंद

Jalgaon : तीन शाळांच्या आठ विद्यार्थ्यांच्या चमुने चमकदार कामगिरी करून स्केटिंगमध्ये जागतिक स्तरावर विक्रम नोंदविला आहे.
Guinness Book of world records in skating competition
Guinness Book of world records in skating competition esakal
Updated on

जामनेर : कर्नाटक राज्यातील बेळगाव येथे झालेल्या गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड बॅक रेकॉर्डमध्ये जामनेर येथील तीन शाळांच्या आठ विद्यार्थ्यांच्या चमुने चमकदार कामगिरी करून स्केटिंगमध्ये जागतिक स्तरावर विक्रम नोंदविला आहे. या कामगिरीने जामनेर शहराचे नाव देशाच्या पटलावर कोरले गेले असून, लाँर्ड गणेशा स्कूलच्या पाच विद्यार्थ्यांची भरीव कामगिरी आहे. शिव गंगा रोलर स्केटिंग क्लब यांच्या वतीने मे अखेरीस बेळगाव येथे २७ ते ३१ मे दरम्यान रेकॉर्ड स्पर्धा आयोजित केली होती. (8 athletes from Jamner entered the Guinness Book of world records in skating competition )

यात १०० मीटर स्पर्धेत १४.८४ सेकंदाचे बँक स्केटमध्ये नवीन रेकॉर्ड करून सतत ७५ तास दोन चाकांची इनलाईन स्केटिंग चालवून रेकॉर्ड पूर्ण करीत गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये विक्रमी नोंद केली आहे. त्यांच्या चमकदार कामगिरीने जागतिक पातळीवर विक्रम नोंदविला आहे. नुकताच याचा निकाल आयोजकांनी जाहीर केला आहे.

Guinness Book of world records in skating competition
Jalgaon News : महामार्गालगतचा सर्व्हिस रोड वाहनधारकांसाठी धोकादायक! संबंधित यंत्रणेकडून दुर्लक्ष

...अशी झाली स्पर्धा

रेकॉर्डसाठी बँकवर्ड १०० मीटर्समध्ये १४.८४ सेकंदचे नवीन रेकॉर्ड सलग ७५ तासांचे, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी दोन चाकांचा वापर करून इनलाईन स्केटसवर सर्वात वेगवान १०० मीर्टस मागे जाण्याचा १४.८४ सेकंदाची विक्रमी नोंद केली आहे. यासाठी डायनॅमिक स्केटिंगचे प्रशिक्षक आनंद आर. मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.

विक्रम नोंदविणारे खेळाडू लोकेश प्रदीप चौधरी, अथर्व शशिकांत पाटील,पार्थ शशिकांत पाटील, अर्णव मनोज जोशी ( रा. पहूर), प्रद्युम्न विक्रम चौधरी, लाँर्ड गणेशा स्कूल जामनेर, इतर दोन स्कूलचे विद्यार्थी भूषण भगवान वराडे, अथर्व जयवर्धन लोखंडे, सागर इसुफ तडवी या आठ विद्यार्थ्यानी यश पटकाविले आहे.

Guinness Book of world records in skating competition
Jalgaon News : धरणगावच्या विवाहाला देवेंद्र फडणवीस, मंत्री, खासदारांसह आमदारांची उपस्थिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.