Jalgaon Sand News : 9 कोटींचा दंड वसुलीची नोंद दिसेना; विभागीय आयुक्तांचे जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश

Jalgaon : हतनूर धरणांच्या वाढीव कामासाठी वापरण्यात येणारा अवैध वाळूचा साठा कंत्राटदाराने केल्याचे भुसावळ महसूल विभागाच्या निदर्शनात आले होते.
sand
sandcrime
Updated on

Jalgaon Sand News : हतनूर धरणांच्या वाढीव कामासाठी वापरण्यात येणारा अवैध वाळूचा साठा कंत्राटदाराने केल्याचे भुसावळ महसूल विभागाच्या निदर्शनात आले होते. तहसीलदारांनी मंडलाधिकाऱ्यांमार्फत पंचनामा करून संबंधितांना ९ कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा दंड ठोठावला. मात्र, तो दंड वसूल केल्याचे रेकार्डवर दिसून येत नसल्याने विभागीय महसून आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी करून अहवाल सादर करावा, असे कळविले आहे. (9 Crore fine recovery record not seen Divisional Commissioner orders inquiry to Collector)

विभागीय आयुक्त कार्यालयातून ८ जुलैला जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले असून, याबाबत राहुल भारती (रा. धुळे) यांनी २४ जूनला अर्ज दिला होता. त्या अर्जात नमूद केलेल्या बाबीचे अनुषंगाने चौकशी करून तरतुदीनुसार आवश्यक कार्यवाही करावी. केलेल्या कार्यवाहीबाबत अर्जदारांना परस्पर कळवावे व अनुपालन अहवाल या कार्यालयास सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

भुसावळ येथील तहसीलदार नीता लबडे यांनी २५ ऑक्टोबर २०२३ ला जळगाव मध्यम प्रकल्प विभाग क्रमांक २ यांना मौजे हतनूर येथील नवीन बांधकामाच्या ठिकाणी आढळून आलेल्या वाळू साठ्याबाबत आदेशांमधील दंडात्मक रक्कम शासन भरणा करून चलन सादर करण्याबाबत कळविले होते. भुसावळ तहसीलदारांनी १० ऑक्टोबर २०२३ ला आदेश देऊन हतनूर या ठिकाणी आढळून आलेल्या वाळू साठ्याबाबत दंडात्मक रक्कम ९ कोटी ३६ लाख ९१ हजार १९० रुपयांचा भरण्याचा दंडात्मक आदेश पारित केला आहे. (latest marathi news)

sand
Jalgaon News : योगशास्त्र विभागातर्फे पदवी, पदविका अभ्यासक्रम! NMUत प्रवेश प्रक्रिया सुरू

आदेशातील दंडात्मक रकमेचा शासनास चलनाने भरणा करून चलन या कार्यालयास सादर करावे, अन्यथा महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ मधील वसूल करावयाच्या कार्यपद्धतीनुसार रक्कम वसूल करण्यात येईल, असे तहसीलदारांनी मध्यम प्रकल्प विभाग क्रमांक दोनचे कार्यकारी अभियंत्यांना लेखी आदेश दिला आहे.

जळगाव मध्यम प्रकल्प विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी भुसावळ तहसीलदारांनी २५ ऑक्टोबरला दिलेल्या आदेशानुसार ९ कोटी ३६ लाख ९१ हजार १९० रुपये कोणत्या दिवशी चलनाने भरले किंवा नाही, याची चौकशी आता जिल्हाधिकारी करणार आहेत. रक्कम चलनाने भरली नसल्यास तहसीलदार नीता लबडे अडचणीत येणार असल्याची दाट शक्यता आहे.

sand
Jalgaon News : फाफोरा येथील बोरी नदीवरील बंधाऱ्यास प्रशासकीय मान्यता!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com