Jalgaon News : एकाच दिवशी 9 जणांचा मृत्यू; स्मशानभूमीत जागा पडली अपुरी

Jalgaon : शहरासह परिसरात एकाच दिवशी नऊ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
Cremation of dead bodies in the open space of the cemetery.
Cremation of dead bodies in the open space of the cemetery.esakal
Updated on

Jalgaon News : शहरासह परिसरात एकाच दिवशी नऊ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. कोणाला हृदयविकाराने तर कुणी आजारी पडून मृत्यू पावले आहे. जामनेरच्या स्मशानभूमीत पाच मृतदेह जाळण्याची व्यवस्था असताना नऊ जणांची व्यवस्था कशी करावी, असा प्रश्न स्मशानभूमी व्यवस्थापकांकडे निर्माण झाला होता. इंदूबाई तापीराम पाटील (वय ८३, रा.आनंदनगर, जामनेर) यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. ()

जगन्नाथ विश्वनाथ थेटे (वय ५४, रा. बजरंगपुरा, जामनेर) यांचाही उष्म्याचा त्रास जाणवल्याने मृत्यू झाला तर दिलीप रामभाऊ येणे (वय ५०, रा. दत्त चैतन्य नगर, सखूबाई (पूर्ण नाव माहीत नाही), रघुनाथ लोहार (वय ७०, रा. जामनेरपुरा), साहेबराव तोताराम चौधरी (वय ८४, रा. कासोदा) हे आपल्या मुलीकडे गिरजा कॉलनी येथे पाहुणे म्हणून आले असताना उष्माघाताने त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Cremation of dead bodies in the open space of the cemetery.
Jalgaon News : मोठा वाघोद्यात CEO सह 25 अधिकाऱ्यांचा ताफा! ‘गॅस्ट्रो’ रुग्ण असलेल्या परिसराची पाहणी; डॉक्टरांना सूचना

अतुल पाटील (वय ३५, होली पॅलेस, जामनेर) हा तरुण चक्कर येऊन पडल्याने त्याचा बळी गेला, असे शहरातील एकूण नऊ जण विविध कारणांमुळे मृत्युमुखी पडले असून, या आधी पंधरा दिवसांपूर्वी शेंगोळा येथील २७ वर्षीय तरुण सादिक अल्लाउद्दीन तडवी हा शेतातून घरी आल्यावर त्याचा मृत्यू झाला तर २२ मेस खादगावचे माजी उपसरपंच प्रमोद चौधरी यांचा २२ मेस दुपारी दीडला शेतातून घरी आल्यावर उन्हाचा त्रास जाणवल्याने त्यांचे निधन झाले.

उन्हाचा प्रचंड पारा वाढल्याने नागरिक हैराण झाले असून, शेतीच्या मशागतीची कामेही रखरखत्या उन्हामुळे थंडावली आहेत. जनतेने गरज असेल तरच बाहेर पडावे, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांनी केले आहे.

Cremation of dead bodies in the open space of the cemetery.
Jalgaon News : बियाण्यांची ज्यादा दरात विक्री थांबवा; महाराष्ट्र शेतकरी संघटना आक्रमक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.