Jalgaon News : आता 24 आठवड्यांवरील गर्भपाताला जिल्ह्यातच परवानगी! शासन निर्देशानुसार मंडळाची स्थापना

Abortion Act : गर्भपात अधिनियमातील २०२१ च्या सुधारणेनुसार जिल्ह्यात वैद्यकीय मंडळ गठीत करण्याच्या सूचना शासनाकडून प्राप्त झाल्या आहेत.
Abortion News
Abortion Newsesakal
Updated on

जळगाव : एखाद्या गर्भवती महिलेच्या जिवाला गर्भामुळे धोका असेल, गर्भातील बाळालाही गंभीर व्यंग येण्याची शक्यता असेल, अशा स्थितीत गर्भपाताच्या (Abortion) कायदेशीर परवानगीसाठी आता शासन निर्देशानुसार जिल्हास्तरावरच जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अध्यक्षतेखाली मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. हेच मंडळ गर्भवतीच्या अर्जानुसार पडताळणी करून गर्भपातास परवानगी देणार आहे. यापूर्वी कायदेशीर गर्भपातासाठी उच्च न्यायालयाच्या परवानगीची आवश्यकता होती. (Jalgaon abortion allowed government marathi news)

देशात वैद्यकीय गर्भपात अधिनियम १९७१ मध्ये लागू कण्यात आला. त्यानंतर राज्यसभेने १६ मार्च २०११ रोजी वैद्यकीय गर्भपात कायदा १९७९ मध्ये सुधारणा करणाऱ्या वैद्यकीय गर्भपात (सुधारणा) विधेयक २०२१ ला मान्यता दिली. या विधेयकानुसार विशेष श्रेणी महिलांसाठी गर्भपाताच्या मुदतीची मर्यादा २० वरून २४ आठवडे करण्यात आली होती.

बलात्कार पीडित महिला, दिव्यांग महिला, अल्पवयीनसह इतर महिलांचा समावेश आहे, त्यातही सत्राचा गर्भवतीच्या जिवास गर्भामुळे धोका असेल, तसेच गर्भातील बाळास गंभीर व्यंग असेल, तरच गर्भपाताची कायदेशीर परवानगी दिली जाते. गर्भपात अधिनियमातील २०२१ च्या सुधारणेनुसार जिल्ह्यात वैद्यकीय मंडळ गठीत करण्याच्या सूचना शासनाकडून प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार २४ आठवड्यांच्या वरील गर्भपाताम कायदेशीर मान्यता देण्यासाठी जिल्हा रुग्णालयात तज्ञ डॉक्टरांचा समावेश असलेल्या वैद्यकीय मंडळाची स्थापना करण्यात आली आहे.

असे आहे मंडळ..

कायदेशीररीत्या वैद्यकीय गर्भपातास परवानगी देण्यासाठी जिल्हा रुग्णालयात स्थापन वैद्यकीय मंडळात अध्यक्ष म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक, तसेच क्ष-किरण तज्ञ, स्त्री-रोग व प्रसुतीशास्त्र तज्ञ, बालरोग तज्ञ, हृदयरोगतज्ञ, श्वसनविकारतज्ज्ञ, अनुवंशशास्त्र तज्ज्ञ, मेंदूविकार तज्ज्ञ आणि मानसोपचार तज्ज्ञ अशा ९ तज्ञ डॉक्टरांचा समावेश आहे.

Abortion News
Jalgaon News: छत्रपतींचे जन्मस्थान 'शिवाई देवराई' बहरले! शिवनेरी किल्ल्यावर सोमवारी लोकार्पण

मंडळाच्या परवानगीशिवाय गर्भपात नाहीच

वैद्यकीय गर्भपात अधिनियम १९७१ मध्ये शासनाने २०२९ मध्ये केलेल्या सुधारणेनुसार २४ आठवड्यांच्या गर्भपातास परवानगी देण्यासाठी शासन निर्देशानुसार स्थापन करण्यात आलेल्या मंडळाची परवानगी अनिवार्य राहणार आहे. या मंडळाच्या परवानगीशिवाय कोणत्याही रुग्णालयास महिलेचा गर्भपात करता येणार नाही.

"गर्भातील बाळाला काही व्यंग असल्यास किंवा गर्भवतीच्या जिवाला गर्भामुळे धोका असल्यास २४ आठवड्यावरील वैद्यकीय गर्भपाताला मंजुरी देण्यासाठी गठीत वैद्यकीय मंडळास पाचारण करावे लागते. या मंडळाच्या परवानगीशिवाय कोणत्याही रुग्णालयास गर्भपात करता येणार नाही. जिल्हा शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठाता यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती आहे."- डॉ.किरण पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक, जळगाव

Abortion News
Musali Phata Robbery Case: दरोडेखोरांच्या हुश्शारीवर पोलिसांची 'कडी'! लूटीचा सक्सेस प्लॅन पण पोलिसच ठरले वरचढ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()