Jalgaon Accident News : पारोळा शहरासह तालुक्यात दुचाकी घसरून 5 जखमी

Jalgaon Accident : शहरासह तालुक्यात दुचाकी घसरून झालेल्या अपघातात पाच जण जखमी झाले. हे अपघात गेल्या आठवड्याभरात घडल्या आहेत.
Accident
Accident esakal
Updated on

Jalgaon Accident News : शहरासह तालुक्यात दुचाकी घसरून झालेल्या अपघातात पाच जण जखमी झाले. हे अपघात गेल्या आठवड्याभरात घडल्या आहेत. याबाबत पारोळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. तालुक्यातील म्हसवे गावाजवळ बुधवारी (ता.२६) रात्री एकच्या सुमारास मोटरसायकल घसरली. त्यात सुनील शांतिलाल चव्हाण (वय २०, रा. बऱ्हाणपूर) व गोंदिया रावजी झांबरे (वय १५, रा. खरगोन) हे दोघेही जखमी झाले. (5 injured in two wheeler fall in Purola town and taluka)

शुक्रवारी (ता.२८) दुपारी साडेतीनच्या सुमारास कासोदा रोडवर शासकीय आयटीआयजवळ मोटरसायकल घसरून त्यात भरत गरमन चव्हाण (वय ४०), सागर भरत चव्हाण (वय १३), दत्तू पोपट चव्हाण (वय ८, सर्व रा. वडगाव ता. पारोळा) हे तिघेही जखमी झाले. घटनास्थळी रुग्णवाहिकाचालक आशुतोष शेलार यांनी तत्काळ धाव घेत जखमींना पारोळा येथील कुटीर रुग्णालयात दाखल केले. त्यांचावर डॉ.जिनेंद्र पाटील यांनी उपचार केला. याबाबत पोलिसांत कुठल्याही प्रकारची नोंद नव्हती.

Accident
Jalgaon Accident News : देवळी गावाजवळ बस- तवेरा अपघातात 2 ठार; दोन गंभीर, मृतात चालकाचा समावेश

दरम्यान, पारोळा येथील धरणगाव मार्गावर भरत भानुदास पाटील (वय ३०, शनी गल्ली, पारोळा) हे रस्त्याच्या कडेला उभे होते. त्याचवेळी एका अज्ञात दुचाकीचालकाने त्यांना जोरदार धडक दिली. त्यात त्यांना उजव्या गुडघ्यास व पायाला जबर दुखापत झाली. ही घटना २० जूनला रात्री पावणेनऊच्या सुमारास घडली. शहरातील खासगी दवाखान्यात त्यांच्यावर उपचार सुरू होता. याबाबत त्यांनी शनिवारी(ता.२९) पारोळा पोलिसांत फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात दुचाकीचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Accident
Jalgaon Accident News : सुसाट कारची दुचाकीला धडक; गर्भवतीचा मृत्यू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.