Jalgaon Accident News : ट्रकला दुचाकी धडकल्याने बापलेकाचा मृत्यू; पत्नी गंभीर

Accident News : उभ्या ट्रकला धडकून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (ता. १९) सायंकाळी सातच्या सुमारास चाळीसगाव-धुळे रस्त्यावरील चिंचगव्हाण फाट्याजवळ घडली.
Accident News
Accident Newssakal
Updated on

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : येथील आठवडेबाजार करून दुचाकीवरून आपल्या पत्नी व मुलासोबत घराकडे जाणाऱ्या सालदारासह त्याच्या मुलाला उभ्या ट्रकला धडकून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (ता. १९) सायंकाळी सातच्या सुमारास चाळीसगाव-धुळे रस्त्यावरील चिंचगव्हाण फाट्याजवळ घडली. कळमडू (ता. चाळीसगाव) येथील किरण पाटील यांच्या शेतात सालदारीचे काम करणारा मोतीराम पावरा (वय ४५) आपली पत्नी, मुलगा व मुलीसह शेतातच वास्तव्यास आहेत. (father and son dies after two wheeler hits truck and Wife serious )

आजचा शुक्रवारचा बाजार असल्याने ते पत्नी व मुलांना घेऊन बाजारात आले होते. खरेदी झाल्यानंतर सायंकाळी सातच्या सुमारास दुचाकी (एमएच ४१, एएल ८१५)वरून आपल्या घरी जाण्यासाठी निघाले असता, धुळे रस्त्यावरील चिंचगव्हाण फाट्याजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रक (एमएच १८, बीजे ७४०९)ला दुचाकी धडकली. धडकेत मोतीराम पावरा, त्यांचा मुलगा विकी पावरा (वय १०) हे दोघे जागीच ठार झाले, तर पत्नी रायाबाई पावरा (वय ४०) गंभीररीत्या जखमी झाली.

Accident News
Jalgaon Accident News: दोन दुचाकींच्या धडकेत वरणगावचा तरुण ठार! दोघे जखमी; वरणगाव पोलिसांत गुन्हा दाखल

अपघाताची माहिती मिळताच १०८ क्रमांकावरील चालक गणेश सूर्यवंशी हे डॉ. एल. टी. महाजन यांच्यासोबत तत्काळ घटनास्थळी रुग्णवाहिका घेऊन आले. त्यातून जखमी महिलेला धुळे येथे रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळी येथील सहाय्यक निरीक्षक प्रवीण दातरे यांच्यासह भूषण बाविस्कर, राकेश काळे यांनी जाऊन वाहतूक सुरळीत केली. दोघांचे मृतदेह विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात आणले. याबाबत येथील पोलिसांत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. अपघातातील मृत मोतीराम पावरा सेंधवा (मध्य प्रदेश) येथील रहिवासी आहेत.

Accident News
Jalgaon Accident News : महामार्गावरील खड्ड्याने घेतले पुन्हा 2 बळी! खोटेनगरजवळ टँकरखाली येऊन दोन तरुणींचा मृत्यू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.