Jalgaon Accident News : पुणे-रावेर बस घाटात उलटली; 9 जखमी

Jalgaon News : छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गावरील अजिंठा घाटात नियत्रंण सुटल्याने पुणे-रावेर बस उलटून नऊ जण जखमी झाले.
Pune Raver bus overturned at ghat
Pune Raver bus overturned at ghat esakal
Updated on

तोंडापूर : छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गावरील अजिंठा घाटात नियत्रंण सुटल्याने पुणे-रावेर बस उलटून नऊ जण जखमी झाले. शुक्रवारी (ता. ३) दुपारी एकच्या सुमारास हा अपघात घडला. पुणे येथून रावेर येथे जाण्यासाठी ६६ प्रवासी घेऊन जाणारी बस (एमएच ४०, वाय ५१९७) अजिंठा घाटात दुपारी एकच्या सुमारास रस्त्याच्या बाजूने उलटली. (Accident Pune Raver bus overturns in ghat)

यात नऊ प्रवाशी गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रफुल्ल साबळे यांनी फौजदार शरद वाघुले, रामराव आढे, भागवत शेळके, ज्ञानेश्वर बेले, ईश्वर पाटील आदी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले आहे.

नऊ जखमींना अजिंठा ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी हलविले व बाकी सुखरूप असलेल्या प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये बसवून दिले. घटनेदरम्यान गंभीर जखमी झालेल्या तिघांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. (Latest Marathi News)

Pune Raver bus overturned at ghat
Car Accident : कार अपघातात सहा ठार; मृतकांमध्ये आमदार सरनाईक यांच्या कुटुंबातील तिघांचा समावेश

जखमी प्रवाशांची नावे अशी : सुशीलाबाई दिनकर निरखे (७०), सुमित्रा दिनकर निरखे (४८), विजय हरी सूर्यवंशी (७२, तिघेही रा. जामनेर) यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे पाठविण्यात आले.

किरकोळ जखमी असे ः सरूबाई श्‍यामराव पाटील (६५, रा. श्रीरामपूर), वसंत विठल पठारे (६५, रा. सोयगाव), निखिल किरण पाटील (१३, श्रीरामपूर), संध्या वसंतराव पठारे (६३, रा. सोयगाव), जयमाला विजय सूर्यवंशी (६०, रा. जामनेर), ज्योती साईचंद्र बासनेवल (४०, रा. संभाजीनगर).

Pune Raver bus overturned at ghat
Jalgaon Accident News : दुभाजकाला टायर घासल्याने फुटून अपघात; 6 प्रवासी जखमी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.