Aditya Thackeray Jalgaon Daura : राज्यात शेतकरी चिंताग्रस्त, महिलांवर अत्याचार होत आहेत, युवक बेरोजगार आहे, गरीब महागाईमुळे त्रस्त आहे. या सरकारला त्यांच्याकडे लक्ष देण्यास वेळ नाही. दुसरीकडे याच सरकारमधील गुंड धमक्या देत आहेत, आमदार पोलिस स्टेशनमध्ये गोळीबार करीत आहेत.
मंत्रालयात रिल काढत आहे. राज्यात असलेले सरकार हे गुंडांचे सरकार आहे, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी जळगाव येथे जाहीर सभेत बोलताना केली. (Shiv Sena Thackeray group of leader Aaditya Thackeray Jalgaon Visit)
जळगाव दौऱ्यावर असलेल्या आमदार आदित्य ठाकरे यांची सुभाष चौकात जाहीर सभा झाली. युवासेनेचे वरूण सरदेसाई, जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत, जिल्हा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, माजी महापौर जयश्री महाजन, माजी उपमहापौर कुलभूषण पाटील.
महानगर प्रमुख शरद तायडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्यामकांत सोनवणे,मनपाचे माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन आदी उपस्थित होते. प्रास्ताविक माजी उपमहापौर कुलभूषण पाटील व माजी महापौर जयश्री महाजन, विष्णू भंगाळे यांनी केले.
रामराज्य कधी येणार
श्री ठाकरे यांनी केंद्र व राज्य सरकारवर सडकून टीका केली, ते म्हणाले, गेल्या दहा वर्षात केंद्रांतील भाजप सरकारला शेतकरी, महिला, युवा आणि गरीब या चार वर्गाकडे लक्ष देण्यास वेळ मिळाला नाही. उद्योगपती मित्रांच्या घशात सर्व काही त्यांनी घातले आहे. देश हातातून निसटू लागल्याने त्यांचे डोळे उघडू लागले आहेत.
३७० कलम रद्द करून पाच वर्षे झाली परंतु काश्मीरी पंडीत त्यांच्या घरी जाऊ शकलेले नाहीत. लडाख मध्ये निवडणूकांसाठी आंदोलन सुरू आहे. दिल्लीत अन्नदाता शेतकऱ्यावर अश्रुधुराच्या नळकांड्या सोडून गोळ्या झाडल्या जात आहे. परंतु त्यांचे प्रश्न समजावून घेतले जात नाही. स्वामिनाथन यांना भारतरत्न दिले परंतु त्यांच्या शिफारसी मात्र लागू केल्या जात नाहीत. मंदिर बनले परंतु रामराज्य कधी येणार?हाच खरा प्रश्न आहे.
राज्यात गुंडांचे सरकार
शिंदे सरकारवर टिका करतांना ते म्हणाले की, राज्यात गुंडाचे सरकार आहे. आमदार पोलिस ठाण्यात बंदूक चालवितात, गुंड मंत्रालयात रिल काढतात. दोन वर्षात राज्यात नवीन उद्योग आलेला नाही, परंतु उद्योगाचे जे काम सुरू होते तेही या गुंडगिरीमुळे बंद झाले आहे. सरकारमधील हे गुंड पार्टनरशिप मागतात, डिलरशिप मागतात, धमकाविण्याचे प्रकार सुरू आहेत.
त्यामुळे उद्योजकांनी सुरू केलेले कामही बंद झाले आहे.हे अत्यंत भीतीदायक आहे. या ठिकाणचे उद्योगही गुजरातला गेले आहेत. वेंदात फॉक्सकॉन हा प्रकल्प गुजरातला गेला तेथून तो थेट देशाबाहेर गेला. असा आरोपही केला.
...तर कडक कायदे
ते म्हणाले की, युवकांना रोजगार नाही, भरती निघाली तर परीक्षांचे पेपर फुटतात. पेपर फोडणारावर कारवाई होत नाही. २०२४ मध्ये आमचे सरकार येणारच आहे. त्यावेळी पेपर फोडणाऱ्यावर कडक शिक्षेची तरतूद करणार आहोत, त्यामुळे अशा प्रकारांना आळा बसेल.
..तर मंत्रालय गुजरातला जाईन
देशात हे सरकार पुन्हा येवू देवू नका असे आवाहन करून ठाकरे म्हणाले, सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास राज्यातील मंत्रालयही गुजरातला जाईल,तसेच या देशाचे संविधान देखील बदलण्याचा प्रयत्न केला जाईल.जाती-जातीत भांडणे लावून लावण्याचा प्रयत्न केला जाईल, त्यामुळे येत्या काळात मतदान करताना जात, पात, धर्म न पाहता केवळ ‘महाराष्ट्र धर्म’ म्हणूनच मतदान करा आणि या सरकाराला घालवा असे आवाहनही त्यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.