अमळनेर : श्रावण महिन्यापासून हिंदू सणांना सुरवात होते. या सणांच्या काळात फळे, मिठाईंना मोठ्या प्रमाणावर मागणी वाढते. मात्र, या मागणीचा गैरफायदा घेत अनेकांकडून खाद्यपदार्थांमध्ये भेसळ केली जाते. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आरोग्याची काळजी घेत भेसळयुक्त पदार्थांच्या आहारी जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. सण, उत्सवांच्या काळात विशेषतः खवा, मिठाई, पनीर, दही, तूप अशा दुग्धजन्य पदार्थांना मोठी मागणी असते. (Administrative appeals to Amalnerkar to take care of their health during festive season from food adulteration )