Jalgaon News : फाफोरा येथील बोरी नदीवरील बंधाऱ्यास प्रशासकीय मान्यता!

Jalgaon : फाफोरा येथील वळण बंधारा व त्याच्या डाव्या तीरावरील पूर पाटचारीच्या दुरुस्तीच्या अंदाजपत्रकास विशेष दुरुस्ती अंतर्गत एक कोटी ५२ लाख रुपये एवढ्या खर्चाच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
Anil Patil
Anil Patilesakal
Updated on

Jalgaon News : तापी पाटबंधारे विकास महामंडळाअंतर्गत अमळनेर तालुक्यातील फाफोरा येथील वळण बंधारा व त्याच्या डाव्या तीरावरील पूर पाटचारीच्या दुरुस्तीच्या अंदाजपत्रकास विशेष दुरुस्ती अंतर्गत एक कोटी ५२ लाख रुपये एवढ्या खर्चाच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी दिली. (Administrative approval for dam on Bori River in Fafora)

याबाबतचा शासन निर्णय २३ जुलै रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर बोरी नदीच्या काठावरील गावांमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या कामाबाबत अधिक माहिती देताना मंत्री पाटील यांनी सांगितले की, बोरी नदीवरील ब्रिटिशकालीन बंधारा-कालवा हा मागील ४० वर्षांपासून बंद आहे. सध्यास्थितीत त्याद्वारे सिंचन करता येत नाही. त्यामुळे हा बंधारा दुरुस्तीची मागणी अनेक वर्षांपासून होती.

फाफोरा बंधाऱ्याच्या डाव्या काठावरील वळण कालवादेखील सुमारे ४० वर्षांपासून बंद आहे. या वळण कालव्याद्वारे फाफोरा, अमळनेर शिवारातील शेतीस पूर्वी सिंचनाचा लाभ होत होता. हा वळण कालवा दुरुस्ती करून त्याद्वारे बोरी नदीतील पाणी वळवून त्याद्वारे अमळनेर परिसरातील धार, मालपूर, साठवण तलावात पाणीसाठा करण्यासाठी त्या परिसरातील १२ गावांच्या सरपंच व ग्रामस्थांनी मंत्री अनिल पाटील यांच्याकडे व प्रशासनाकडे निवदेनाद्वारे मागणी केली होती. (latest marathi news)

Anil Patil
Jalgaon News : राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे केंद्र सरकारचा गाजर दाखवून निषेध!

या ठिकाणी हा वळण कालवा दुरुस्ती करून त्याद्वारे बोरी नदीतील पाणी धार, मालपूर साठवण तलावात वळवून साठा करण्यास व त्या परिसरातील १२ गावांना पाणी देण्याच्यादृष्टीने फाफोरा वळण बंधारा कालवा दुरुस्तीच्या कामास विशेष दुरुस्तीअंतर्गत प्रशासकीय मान्यता देण्याची मागणी मंत्री पाटील यांनी शासनाकडे केली होती.

मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्र्यांचे आभार!

मंत्री अनिल पाटील यांनी या कामाची मागणी करून त्यासाठी सातत्याने पाठपुरावादेखील केला. त्यामुळे अखेर या कामाला प्रशासकीय मान्यताही त्यांनी मिळवून दिली. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठी भेट यानिमित्ताने मिळाली आहे. या कामाच्या मंजुरीबद्दल मंत्री अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानले.

Anil Patil
Jalgaon Road Damage : पारोळा-अमळनेर रस्त्याची चाळण! बससह दुचाकींचा चिखलातून प्रवास

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com