Jalgaon Rain Update : जिल्ह्यात आठ दिवसांच्या ‘ब्रेक’नंतर पावसाचे पुनरागमन!

Latest Rain News : आज सकाळी भुसावळसह काही भागात पाउस झाला. दुपारनंतर जळगाव शहरासह जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली.
Rain Update
Rain Updateesakal
Updated on

Jalgaon Rain Update : जिल्ह्यासह राज्यात अनेक भागात गेल्या आठ दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. आज सकाळी भुसावळसह काही भागात पाउस झाला. दुपारनंतर जळगाव शहरासह जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे पुन्हा एकदा पाऊस हळहळू सक्रिय होत असल्याचे दिसून येत आहे. (eight day break in district rain returns)

Rain Update
Ganesh Visarjan Miravnuk : मालेगावी अमाप उत्साहात ‘श्रीं’ ना निरोप; मिरवणूक मार्गावर चोख बंदोबस्त

गणेशोत्सवापासून कमी अधिक प्रमाणात चार, पाच दिवस पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर मात्र पावसाने विश्रांती घेतली होती. गणेशोत्सवादरम्यान गणेशभक्तांना आरास सजावटी पहाण्यास मोठी गर्दी होत होती. मात्र अनंत चतुर्दशीनंतर राज्यामध्ये पावसाचे दमदार आगमन होणार असल्याचे अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. आज दुपारनंतर जिल्ह्यात पावसाच्या तुरळक ते मध्यम स्वरूपात सरी कोसळत आहे.

ऑक्टोबरच्या पहिल्या सप्ताहात परतीच्या पावसास सुरवात होऊन १५ ऑक्टोबरपर्यंत राज्यातून बाहेर पडतो. परंतु यावेळी सद्यस्थितीत सप्टेंबरमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान अभ्यासकांनी व्यक्त केली असून, पाऊस ऑक्टोबरमध्येही लांबणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जळगावसह परिसरात २१ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान दमदार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Rain Update
Jalgaon Eid-e-Milad-un-Nabi: शहरात ‘ईद-ए-मिलादुन्नबी’ उत्साहात! विश्र्वशांतीसाठी प्रार्थना; मिरवणुकीत हजारो तरुणांचा सहभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.