Jalgaon Lok Sabha Election : जळगावसाठी 25, रावेरसाठी मतमोजणीच्या 24 फेऱ्या; मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून पाहणी

Lok Sabha Election : मतदानानंतर आता जिल्हा प्रशासनाकडून मतमोजणीची तयारी सुरू झाली आहे.
Jalgaon Lok Sabha Election
Jalgaon Lok Sabha Electionesakal
Updated on

Jalgaon Lok Sabha Election : मतदानानंतर आता जिल्हा प्रशासनाकडून मतमोजणीची तयारी सुरू झाली आहे. जळगाव मतदारसंघासाठी २५, तर रावेरसाठी २४ फेऱ्या होणार असल्याची माहिती जळगावचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. दरम्यान, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी जळगाव दौरा करून स्ट्राँग रूमची पाहणी करून मतमोजणीच्या तयारीचा आढावा घेतला. ( After polling preparations for counting of votes have started )

जिल्ह्यातील दोन्ही लोकसभेला मतदारसंघांसाठी यंदा ६० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले. यात जळगाव लोकसभा मतदारसंघात ५८.४७ , तर रावेर मतदारसंघात ६४.२८ टक्के मतदान झाले आहे. ४ जूनला मतमोजणी होणार आहे. ईव्हीएम यंत्रे वखार महामंडळाच्या गुदामात सील केल्या आहेत. प्रत्येक दरवाजावर चार कुलपे लावली आहेत, तसेच संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. मतमोजणीसाठी १४ टेबल लावण्यात येणार असून, प्रत्येक टेबलवर एक केंद्र आणि दोन राज्यस्तरीय कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.

जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी २५ आणि रावेरसाठी २४ फेऱ्या होणार आहेत. सकाळी साडेआठला पहिल्या फेरीच्या मतमोजणीला सुरवात होणार आहे. प्रत्येक फेरीसाठी किमान ३० मिनिटांचा अवधी लागणार आहे. त्यामुळे अधिकृत निकाल हा १२ तासानंतर म्हणजेच रात्री नऊपर्यंत जाहीर केला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. (latest marathi news)

Jalgaon Lok Sabha Election
Jalgaon Lok Sabha Election : शहरात लोकशाहीच्या उत्सवाचा उत्साह! सकाळपासूनच मतदानासाठी रांगा

मुख्य निवडणूक अधिकारी जळगावात

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम गुरुवारी (ता. १६) जळगाव दौऱ्यावर आले होते. सकाळी साडेसातला त्यांनी वखार महामंडळाच्या गुुदामस्थळी भेट देऊन स्ट्राँग रूमची पाहणी केली, तसेच याठिकाणी सुरक्षेसाठी तैनात केलेल्या ‘एसआरपीएफ’, ‘सीआरपीएफ’च्या तुकडींना भेट देऊन बंदोबस्ताचा आढावा घेतला.

मतमोजणीच्या तयारीचीही त्यांनी माहिती घेतली. मतदानाचा टक्का वाढल्याने चोकलिंगम यांनी जिल्हा प्रशासनाची पाठही थोपटली. या वेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते उपस्थित होते.

Jalgaon Lok Sabha Election
Jalgaon Lok Sabha Election : यंदा मतदान करणाऱ्यांच्या संख्येत 8 टक्क्यांनी वाढ; दोन्ही मतदारसंघातही वाढ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.