पारोळा : केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्यात २१ व्या पशुगणनेला १ सप्टेंबरपासून सुरुवात होणार होती. मात्र, ती पुढे ढकलून १५ सप्टेंबरला होणार होती. या गणनेसाठी पशु गणक पर्यवेक्षकांच्या नेमणुका होऊन त्यांचे प्रशिक्षणही पूर्ण झाले आहे. मात्र, पुन्हा अधिसूचनेच्या प्रतीक्षेमुळे तसेच पशुगणना करण्यासाठी नोंद करण्यासाठीचे ‘ॲप’ अद्ययावत होत असल्यामुळे २१ वी पशुगणना पुन्हा लांबणीवर पडली आहे. त्यामुळे पशुगणना नेमकी कधी सुरू होणार, याकडे पशुमालकांचे लक्ष लागले आहे. (Again delay for livestock census Awaiting notification )