Fake Fertilizers : गुजरातमधील बनावट खतांचा ट्रक पकडला; जळगाव कृषी विभागाच्या भरारी पथकाची कारवाई

Fake Fertilizers : गुजरातमधून जळगावमध्ये विक्रीसाठी आलेला बनावट खतांचा ट्रक जळगाव कृषी विभागाने पकडला आहे.
Officials of the Agriculture Department apprehending a fake fertilizer truck.
Officials of the Agriculture Department apprehending a fake fertilizer truck.esakal
Updated on

जळगाव : गुजरातमधून जळगावमध्ये विक्रीसाठी आलेला बनावट खतांचा ट्रक जळगाव कृषी विभागाने पकडला आहे. गुजरातमधून महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बनावट खते शेतकऱ्यांना विक्रीस उपलब्ध होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने गुण नियंत्रण विभागाचे संचालक विकास पाटील (पुणे) यांच्या आदेशानुसार गुजरातमधील अवैध, विनापरवाना व बनावट खतांना आळा घालण्यासाठी नाशिक विभागातील गुण नियंत्रण शाखेने तपासण्या सुरु केल्या आहेत. (Agriculture Department team caught fake fertilizer truck in Gujarat )

शुक्रवारी (ता.२०) जळगाव जिल्हा भरारी पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार नांद्रा (ता. जि. जळगाव) येथे गुजरातमधील खत कंपनी शेतकऱ्यांना विक्रीसाठी येणार असल्याचे समजले. त्यानुसार जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे यांनी जळगाव पंचायत समितीचे कृषी अधिकारी धीरज बढे, मंडळ कृषी अधिकारी अमित भोसले यांच्या पथकाने पाळत ठेऊन ट्रकमधून मे. जेनिक केमटेक कॉर्पोरेशन कंपनीचे नाव लिहिलेल्या सेंद्रिय खताच्या १५२ गोण्या शेतकऱ्यांच्या बांधावर उतरवताना छापा टाकून जप्त केल्या. (latest marathi news)

Officials of the Agriculture Department apprehending a fake fertilizer truck.
Nashik Fake Fertilizer : बनावट खत विक्रेते रडारवर; कृषी विभागातर्फे 17 पथके

या सेंद्रिय खतांच्या बॅगवर मे. जेनिक केमटेक कॉर्पोरेशन या खत कंपनीचे बोगस नाव टाकून शेतकऱ्यांना विक्री केली आहे. मे. दक्षकमल ट्रेडर्स (शहादा, जि. नंदुरबार) मालक संशयित चंद्रकांत पाटील हे में. जेनिक केमटेक कार्पोरेशन या कंपनीचे नाव टाकून सेंद्रिय खत शेतकरी बांधवांना विक्री करत होते. याप्रकरणी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक बोरसे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अवैध, बनावट व विनापरवाना खत विक्री करणाऱ्या मे. दक्षकमल ट्रेडर्स (शहादा) यांचे मालक चंद्रकांत पाटील, जोधा पंपारीया भरतभाई, दिनेश पाटील यांच्यावर जळगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Officials of the Agriculture Department apprehending a fake fertilizer truck.
Fake Fertilizer : भेसळयुक्त खतामुळे शेतकरी होणार उद्धवस्त...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.