Jalgaon Agriculture News : 'लाख' मोलाचे 'टरबूज' अन् वाढती लागवड! गणपूर येथील दोन शेतकऱ्यांना एकरी लाखाचे उत्पन्न

Jalgaon News : खानदेशात गेल्या दशकभराशी तुलना करता दरवर्षी टरबूज लागवडीचे प्रयोग वाढू लागले आहेत.
Workers cutting watermelons and loading them into trucks
Workers cutting watermelons and loading them into trucksesakal
Updated on

गणपूर,(ता चोपडा) : खानदेशात गेल्या दशकभराशी तुलना करता दरवर्षी टरबूज लागवडीचे प्रयोग वाढू लागले आहेत. तीन महिन्यांच्या कालावधीत उत्पादन खर्च अधिक असलेल्या पिकात एकरी लाखाचे उत्पन्न घेत शेतकरी या पिकाकडे वळत असल्याचे दिसून आले आहे. (Jalgaon increasing cultivation To farmers in Gangapur got income of one lakh per acre marathi news)

येथे नरेश शांताराम पाटील व जितेंद्र लोटन पाटील या दोन युवा शेतकऱ्यांनी दोन एकरमध्ये तीन महिन्याचे हे पीक घेऊन नशीब आजमावण्याचा प्रयोग केला त्यातून त्यांना एकरी एक लाखाचे उत्पन्न आले आहे. ही लाख मोलाची कमाई कमी दिवसात येणारी असली तरी हे जोखमीचे पीक असल्याचेही दिसून येते. साधारणपणे रमजान महिन्यात टरबूज निघत असल्यास भाव चांगला मिळून उत्पन्न अधिक येते.असे अनुभव असल्याचे शेतकरी सांगतात.  (latest marathi news)

Workers cutting watermelons and loading them into trucks
Nashik Agriculture News : पाण्याच्या नियोजनातून फुलली मिरचीची शेती; टरबुजाचे आंतरपीक घेत साधली उत्पन्नाची किमया

तीन टप्प्यात विक्री

टरबूज तीन टप्प्यात विकले जाते.प्रथम प्रतीचा माल अधिक भावात म्हणजे ८ ते १५ रुपये किलोने विक्री होतो. टरबूज दोन किलोपेक्षा अधिक वजनाचे असते. तर दुसरी तोडणी कमी भावात जाते. हे टरबूज दोन किलोपेक्षा कमी वजनाचे असतात.त्यांना ४ ते ४ रुपयांचे दर मिळतात.आणि तिसरी तोडणी स्वतः टरबूज तोडून खेडोपाडी विक्री होतात त्यातून पाच दहा हजार रुपये मिळू शकतात.

नरेश पाटील आणि जितेंद्र पाटील यांचा प्रथम तोडणीला साडे आठ रुपयांचा भाव मिळाला आणि २५ टन माल विकला गेला,तर दुसऱ्या तोडणीला ४ रुपयांचा दर मिळून आठ टन टरबूज विकले गेले.उर्वरित माल स्वतः तोडून त्यांनी दहा हजार रुपयांच्या टरबुजची विक्री केली. एकंदरीत त्यांना एकरी एक लाख पाच हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले.

Workers cutting watermelons and loading them into trucks
Jalgaon Agriculture News : ज्वारी उत्पादकांना साडे तिनशे कोटीहून अधिक दणका!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.