प्रल्हाद सोनवणे : सकाळ वृत्तसेवा
जामनेर : मृग नक्षत्राला प्रारंभ झाला असून, यंदा पावसाची सुरवात चांगली झाली आहे. शेतकरी मशागतीची कामे करीत आहे. शेतमालाच्या घसरणाऱ्या दरामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. यंदा जमिनीची मशागत, नांगरणी आदी कामे ट्रॅक्टरने केली जात आहेत; पण सर्वच खर्च यंदा वाढला आहे. (Jalgaon Agriculture Mrug Nakshatra begins cultivation speed in Jamner)
कपाशीचे क्षेत्र ८४ हजार हेक्टरवर
जामनेर तालुक्याचे खरिपाचे एकूण क्षेत्र साधारणत ९९ हजार ४३० हेक्टर असून, यंदाही ९९ हजार हेक्टरपर्यंत लागवडीचे उद्दिष्ट कृषी विभागाने निश्चित केले आहे. मागील हंगामात ९६८७१ हेक्टरवर पेरणी झाली होती. यात कापूस ८४५६३ हेक्टर, कडधान्य ३४१५ हेक्टर, तृणधान्य ८३०० हेक्टर, तेलबिया ५०१ हेक्टर व इतरही पिके समाविष्ट होती.
कापसाचा भाव, अवकाळी व अपुरा पाऊस, बोंडआळीचा प्रादूर्भाव आदी गोष्टी लक्षात घेता, कापसाचे क्षेत्र साधारणत: ८० हजार हेक्टरपर्यंत कमी करून त्याऐवजी कडधान्य ५ हजार हेक्टर, तृणधान्य १० हजार व तेलबिया १ हजार हेक्टरपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट कृषी विभागाने निश्चित केले आहे.
कापूस पिकात उडीद, मूग, तूरचे आंतरपीक घेणे, सलग तूर, तूर व सोयाबीन, अशाप्रकारची प्रात्यक्षिके घेऊन क्षेत्र विस्तारासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. शेतीशाळेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी प्रवृत्त करण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. (latest marathi news)
बळीराजाला आशा...
यंदाच्या मान्सून हंगामाच्या प्रारंभी खतांसह विविध वस्तूंच्या भाववाढीने शेतकरी पुरता हैराण झाला आहे. येत्या खरीप हंगामात चांगला पाऊस होईल, या अपेक्षेने बळीराजा खरिपाच्या तयारीला लागला आहे.
"कापसाच्या राशी ६५९, कबड्डी यासारख्या वाणांचा तुटवडा लक्षात घेऊन, कृषी विभागाने कृषी केंद्रांवर कृषी सहाय्यकांच्या देखरेखीत खते व बियाणे वाटपाचे नियोजन केले आहे. प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत मागील वर्षी जामनेर तालुक्यात ५२ हजार हेक्टरवरील पिकांचा विमा काढला होता. यंदाही ४५ ते ५० हजार हेक्टरपर्यंत पीकविमा काढण्यात येईल."
- धनश्री चासकर, तालुका कृषी अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.