Jalgaon Agriculture News : जिल्ह्यात विविध पिकांवरील बीजप्रक्रिया प्रात्यक्षिके; खरीप हंगामाची तयारी

Jalgaon Agriculture : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात बीजप्रक्रिया मोहीम क्षेत्रीय स्तरावर लोकसहभागातून मोठ्या प्रमाणावर राबविण्यात आली.
Seed
Seedesakal
Updated on

Jalgaon Agriculture News : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात बीजप्रक्रिया मोहीम क्षेत्रीय स्तरावर लोकसहभागातून मोठ्या प्रमाणावर राबविण्यात आली. त्यानुषंगाने या वर्षीच्या खरीप हंगामामध्ये जिल्ह्यात ज्वारी, मका, सोयाबीन, तूर, कापूस, ऊस, उडीद व मूग या प्रमुख पिकांसाठी बीजप्रक्रिया प्रात्यक्षिके कृषी सहाय्यक यांच्या कार्यक्षेत्रात विना अनुदान तत्त्वावर राबविण्यात येणार आहे. ( Seed processing demonstration on various crops in district )

जमिनीतून, तसेच बियाण्याद्वारे पसरणारे जीवाणूजन्य-विषाणूजन्य, बुरशीजन्य रोग व किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या रोगांचे वेळीच नियंत्रण करणे गरजेचे असून, बीजप्रक्रिया अत्यंत प्रभावी साधन आहे. बियाणे बदल कमी असलेल्या पिकांमध्ये शेतकऱ्यांकडील स्वत:चे बियाणे वापराचे प्रमाण जास्त असल्यामुळे या रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे.

मर, मोझॅक रोगांचा प्रादुर्भाव

राज्यात २०२३-२४ मध्ये तूर पिकावर मर रोग, सोयाबीन पिकावर मोझॅक या रोगांचा प्रादुर्भाव आढळून आला होता. रोगांमुळे शेतकऱ्यांच्या पीक संरक्षणावरील खर्च वाढून पिकांच्या उत्पादन खर्चात वाढ होत आहे, तसेच पर्यायाने उत्पादनही घटत आहे. त्यासाठी बीजप्रक्रिया मोहिमेंतर्गत अशा शेतकऱ्यांना स्वत:कडील घरगुती वापरण्यात येणाऱ्या बियाण्यास बीजप्रक्रिया करण्यास प्रोत्साहित करून बीजप्रक्रियायुक्त बियाण्याची जास्त प्रमाणावर पेरणी करणे व बियाण्यायद्वारे पसरणारे जीवाणूजन्य- विषाणूजन्य, बुरशीजन्य रोग व किडीचा प्रादुर्भावाला आळा घालणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. (latest marathi news)

Seed
Jalgaon Agriculture News : केळी पीकविम्याबाबत 15 दिवसांत सकारात्मक निर्णय; शेतकऱ्यांचा दिलासा

हे असे आहेत फायदे

बियाण्यापासून प्रसारित होणाऱ्या आणि जमिनीत असणाऱ्या बुरशीच्या जिवाणूपासून संरक्षण मिळते, जमिनीत असणाऱ्या किडी व पेरणीपासून ३०-३५ दिवस रस शोषक किडी आणि खोड माशी प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो, कीड व रोग व्यवस्थापनेच्या खर्चात बचत होते, बियाण्याची उगवण क्षमता वाढवते, जैविक खताच्या प्रक्रियेमुळे जिवाणू झाडांना अन्नद्रव्य लवकर उपलब्ध करून देतात, उत्पादनात वाढ होते.

ही घ्या काळजी

-बीजप्रक्रिया करण्यासाठी हातमोजे, मास्क, चष्मा यासारख्या गोष्टींचा वापर करावा

-बीजप्रक्रिया तळवटावर किंवा बारदाण्यार किया यंत्राद्वारे सावलीत करावी

-बियाणे हाताने चोळू नये, कापडाने किंवा पिशवीत एकत्र मिसळून घ्यावे

-रासायनिक आणि जैविक बीजप्रक्रिया एकत्र करू नये

-जैविक बीजप्रक्रिया ही रसायनिक बीजप्रक्रियानंतर करावी आणि यामध्ये २.५-३ तासाचे अंतर असावे

-बीजप्रक्रिया केलेले बियाणे ३-४ तासांच्या आत पेरणीसाठी वापरावे

-बीजप्रक्रिया बुरशीनाशक-कीटकनाशक जीवाणू अशा क्रमाने करावी

Seed
Jalgaon Agriculture News : खरिपासाठी आजपासून बीटी बियाणे विक्री; 27 लाखांवर बियाणे पाकिटे उपलब्ध

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.