Jalgaon Agriculture News : शंभर मिमी पाऊस पडल्यावरच पेरणी करा; कृषी अधिकाऱ्यांचा सल्ला

Jalgaon Agriculture : काही वर्षांपासून मॉन्सूनचे आगमन उशीरा होत आहे. त्यामुळे खरिप हंगामातील पेरण्याही उशिराने होत आहेत.
farmer Sowing
farmer Sowingesakal
Updated on

Jalgaon Agriculture News : गेल्या काही वर्षांपासून मॉन्सूनचे आगमन उशीरा होत आहे. त्यामुळे खरिप हंगामातील पेरण्याही उशिराने होत आहेत. त्याचाच परिणाम हंगामाच्या उत्पादनादेखील झालेला पाहावयास मिळाला आहे. यावर्षी मात्र, मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे खरिप हंगामातील पेरणीला लवकर वेग येण्याची शक्यता आहे. ( Sow only after 100 mm of rain advice of agriculture officials )

मात्र, शेतकऱ्यांनी शंभर मिमी पाऊस पडल्यानंतर पेरणी करावी, असा सल्ला भुसावळचे तालुका कृषी अधिकारी शरद बोरसे यांनी दिला आहे. साधारणपणे एक जून ते ३० सप्टेंबर हा मॉन्सूनचा कालावधी समजला जातो. यंदा मॉन्सूनचे लवकर आगमन व सरासरी १०६ मिमी पाऊस होणार असल्याचे भाकीत हवामान विभागाच्या वेधशाळेने वर्तविले होते. त्यानुसार मॉन्सूनचे आगमन झालेही. मृगाच्या पूर्वसंध्येलाच पावसाच्या सरी कोसळल्या.

मात्र, हा पाऊस मॉन्सूनचा की वाळवीचा, याबाबत अजूनही अनेकांत साशंकता आहे. सहा जूनच्या आधीपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. दोन दिवसांपासून ढग दाटून येत आहेत. तूरळक पाऊसदेखील होत आहे. वातावरणातील आर्द्रतेचा टक्कासुद्धा वाढत आहे. त्यामुळे जोरदार पावसाचे संकेत दिसत आहेत. भुसावळ तालुक्यात पाऊस जरी चांगला होत असला तरी एवढ्या पावसाच्या भरवशावर खरीप पेरणी करणे चुकीचे ठरेल. (latest marathi news)

farmer Sowing
Jalgaon Agriculture News : शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी 10 टक्के वाढीव कर्ज : जिल्हाधिकारी प्रसाद

त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करता पेरणीयोग्य पावसाची वाट पाहावी. त्यातही सरासरी १०० मिमी पाऊस होईपर्यंत किंवा जमिनीमध्ये दोन ते तीन फूट खोल ओलावा निर्माण होत नाही, तोपर्यंत पेरणी करण्याची शेतकऱ्यांनी घाई करू नये, असा सल्ला भुसावळ तालुक्याचे कृषी अधिकारी शरद बोरसे यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. कारण

भुसावळ तालुक्यातील बहुतांश भागात पेरणी व लागवडीची लगबगसुद्धा सुरू झालेली दिसत आहे. खते, बी-बियाणे आदी शेतीपयोगी वस्तू खरेदीलादेखील जोर आलेला आहे. म्हणून जमिनीत दोन ते तीन फूट खोल ओलावा निर्माण होत नाही, तोपर्यंत पेरणी न करण्याचा सल्ला दिल्याने शेतकऱ्यांनीदेखील आता पावसाची वाट पाहण्याची भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.

बियाण्यांची निवड जपून करा

पावसाच्या सरी कोसळताच शेतकऱ्यांनी बी-बियाणे खरेदीला सुरुवात केलेली आहे. मात्र, बियाणे खरेदी करताना प्रमाणित, शिफारसीत वाणांची निवड करून नोंदणीकृत केंद्रावरूनच खरेदी करावी. बियाण्यांच्या पिशवीवर मुदत, किंमत व कंपनीची खात्री करावी. बियाणे खरेदी पश्चात विक्रेत्यांकडून पक्के बिल घेणे आवश्यक आहे, अशी माहितीही कृषितज्ज्ञांनी ‘सकाळ’ला दिली.

farmer Sowing
Jalgaon Agriculture News: मृग नक्षत्र सुरू, जामनेरात मशागतीला वेग! तालुक्यात 99 हजार हेक्टरवर पेरणी; कापसाला प्राधान्य

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.