जळगाव : जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मोठा गाजावाजा करीत जळगाव विमानतळावरून (Airport) अहमदाबाद ते जळगाव, जळगाव ते मुंबई अशी विमानसेवा सुरू केली होती. ही विमानसेवा तब्बल तीन महिन्यापासून बंद झाल्याने एकाही विमानाने जळगाव विमानतळावरून ‘टेकऑफ’ (take off) केले नाही. गेल्या मार्चपासून विमानसेवा खंडित झाली आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यातील व्यापारी, उद्योजकांची नाराजी आहे. जिल्ह्यातील दोन्ही खासदार भाजपचे (BJP) असून केंद्रातही भाजपची सत्ता आहे. असे असताना तीन महिन्यांपासून विमानसेवा बंद असण्याची नामुष्की ओढवली आहे. दोन्ही खासदारांचे प्रयत्न अपूर्ण पडत असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. (jalgaon air service closed from 3 months Jalgaon News)
केंद्र शासनाने ‘उडाण’ योजनेअंतर्गत जळगावमधून मुंबईसाठी विमानसेवा सुरू केली. यामुळे जळगावातील उद्योजक, व्यापारी, डॉक्टर, वकील, बांधकाम व्यावसायिक आदी क्षेत्रात विमानसेवेचे स्वागत करण्यात आले होते. जळगावमधून मुंबईला जाणे व त्याच दिवशी परत येणे विमानसेवेने शक्य झाल्याने उद्योजकांच्या वेळेची बचत होत होती. आधी एअरजेट व नंतर टुजेट विमान कंपनीने विमानसेवा सुरू केली. याला चांगला प्रतिसाद होता. मात्र अचानक टुजेट विमान कंपनीने सेवा परवडत नसल्याचे कारण सांगत विमानसेवा बंद केली. यामुळे जळगावमधून मुंबईला जाणाऱ्या व्यापाऱ्यांचे हाल होवू लागले. कोट्यवधी रुपये खर्च करून विमानसेवा सुरू केली. नाईट लँडिंगचीही सोय नुकतीच करण्यात आली होती. मात्र विमान कंपन्यांनी सेवा परवडत नसल्याचे कारण सांगत अचानक विमानसेवा का बंद केली ? हा प्रश्न निर्माण होत आहे. विमानसेवा चांगली सुरू असताना जळगाव ते पुणे, इंदूर येथेही सेवा सुरू करण्याची मागणी होत होती. मात्र आता विमानसेवाच बंद पडल्याने व्यापारी, उद्योजकांना मुंबईला जाण्यास वेळ लागतो.
"जळगावमधील बंद पडलेली विमानसेवा पूर्ववत होऊन व्यापाऱ्यांसह सर्वानाच या सेवेचा लाभ मिळण्यासाठी महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्री पुढाकार घेत आहे. लवकरच केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेणार आहे."
- दिलीप गांधी, गर्व्हनर कौसिल सदस्य, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीज.
"जळगावमधून विमानसेवा बंद झाल्याने उद्योजक, व्यापारी यांना ट्रेनने किंवा खासगी वाहनाने मुंबईला जावे लागते. यात वेळेचा अपव्यय होतो. विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळत होता. विमानतळ चांगले आहे. रात्रीही विमानसेवा सुरू करता येईल. लोकप्रतिनिधींनी यात पुढाकार घेणे अपेक्षीत आहे." - पुरुषोत्तम टावरी, ‘कॅट’चे उपाध्यक्ष.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.