जळगाव विमानतळावरून हैद्राबाद, गोवापाठोपाठ बघता- बघता मुंबई, पुण्याकडेही विमान प्रवासी घेऊन झेपावू लागले. याआधी विमानतळाचा विकास होऊन केंद्र सरकारच्या ‘उडान’ योजनेंतर्गत प्रवासी सेवा सुरू झाली होती. नंतरच्या काळात त्यात खंड पडला. प्रतिसाद आणि विमान लॅण्डिंगच्या स्लॉटचे कारण पुढे करत संबंधित कंपनीने सेवा बंद केली.
आता मात्र विमानतळावरून ही प्रवासी सेवा कार्यान्वित होण्याला चार- सहा महिने झालेत. सध्यातरी या चारही ठिकाणच्या सेवेस प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळतोय, सेवेतही सातत्य आहे. अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा या सेवेने संपवलीय. या नियमित आणि सातत्यपूर्ण सेवेला ‘नजर ना लग जाएं’, अशी प्रार्थना करायला हरकत नाही. (Jalgaon airport Air service)