जळगाव विमानतळ बाँबने उडविण्याची धमकी

मॉक ड्रील असल्याचे जाहीर : सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका
Jalgaon Airport Bomb to fly Threatened
Jalgaon Airport Bomb to fly Threatenedsakal
Updated on

जळगाव : जळगाव विमानतळ (Jalgaon Airport) बाँबने उडविण्याची धमकी आली अन्‌ सर्व पोलिस यंत्रणा, सुरक्षा यंत्रणेच्या काळजाचा ठोका चुकला. आता काय होणार? याची भीती अन्‌ बाँब निकामी करण्यासाठी सुरक्षा यंत्रणेसह जिल्हा प्रशासकीय यंत्रणा, पोलिसांनी काही मिनिटांतच बाँब निकामी केला. मात्र ही धमकी मॉक ड्रीलचा प्रकार असल्याचे समजताच सर्वांनीच सुटकेचा निःश्‍वास सोडला.

Jalgaon Airport Bomb to fly Threatened
OBC बैठकीसाठी भुजबळ दिल्लीत; लालूप्रसाद, सिताराम येचुरींची उपस्थिती

जळगाव विमानतळावरील ट्रजेट कंपनीच्या कार्यालयात दुपारी तीन ते चारच्या सुमारास एक निनावी फोन आला, की विमानतळावर बाँब ठेवला आहे आणि विमानतळ उडणार आहे. ही धमकी मिळताच एअरलाइन्सच्या सुरक्षा व्यवस्थापकांनी त्वरित सर्व प्रवासी व कर्मचारी यांना बिल्डिंग रिकामी करण्याची सूचना दिली. यासंबंधीची सूचना विमानतळ संचालकांना दिली. विमानतळ संचालकांनी तत्काळ ही बातमी सर्व सुरक्षा यंत्रणांना, भागधारकांना दूरध्वनीवरून कळवली. १५ ते २० मिनिटांत सर्व यंत्रणांनी तत्काळ आपली उपस्थिती विमानतळावर दाखविली. उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे यांच्या मार्गदर्शनाखाली बीडीडीएस टीमने बिल्डिंगचे निरीक्षण करून अत्याधुनिक उपकरणांद्वारे व प्रशिक्षित श्वान पथकाचा उपयोग करून बाँबसदृश वस्तूचा शोध घेतला. बाँबसदृश वस्तूला विमानतळावर असलेल्या बाँब कुलिंग पीटमध्ये नेऊन तिचे निराकरण केले. ही संपूर्ण प्रक्रिया ३५ मिनिटांत झाली. नंतर पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या नेतृत्वाखाली बाँब रिमूव्ह कमिटीची बैठक झाली. त्यात या पूर्ण सरावातील त्रुटी सांगून चर्चा झाली. त्या सुधारण्यासाठी संबंधितांना सूचना देण्यात आल्या.

Jalgaon Airport Bomb to fly Threatened
नागपूर : मूल्यमापन अहवालाबाबत दिरंगाईमुळे विविध पदे रिक्त

हा सराव आपत्कालीन परिस्थितीमध्ये सुरक्षा संबंधित दुसऱ्या एजन्सी जशा, महाराष्ट्र पोलिस टीमकडून मिळणाऱ्या सहकार्य आणि प्रतिसाद यांची तपासणी करण्यात आली. या संपूर्ण सरावाचे संचलन पोलिस निरीक्षक शिकारे यांच्या सुचनेनुसार, बाँबशोधक व निकामी करण्याची यंत्रणा पथकाचे प्रमुख आर. डी. मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहकारी सोनू पटेल, मुख्य सुरक्षा अधिकारी भारतीय विमानतळ प्राधिकरण, एमएसएफचे मोज्जुदीन शेख, सहायक सुरक्षा अधिकारी, डॉ. नितिन विसपुते (जिल्हा रुग्णालय), डॉ. विलास मालकर, ट्रुजेट कंपनी व्यवस्थापक हेमा चंदर, पोलिस राजेश पाटील, महेंद्र पाटील, विशाल पाटील यांनी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.