जळगाव : राज्यातील महायुतीचे सरकार सध्या दिवाळखोर आहे. त्यांच्याजवळ पैसे शिल्लक नाहीत. कर्ज काढून योजना व कामे करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करीत आहे, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते, माजी महसूल मंत्री तथा आमदार एकनाथ खडसे यांनी केला. शेळगाव प्रकल्पासंदर्भात माहिती देण्यासाठी रविवारी (ता. ६) झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. धुळ्याचे माजी आमदार के. सी. पाडवी उपस्थित होते. (Allegation of bankrupt Eknath Khadse grand coalition government in state )
आमदार खडसे म्हणाले, की सध्याचे सरकार दिवाळखोर झाले असून, त्यांनी तीन हजार कोटी रुपयांचे कर्ज काढले आहे. लाडकी बहीण योजनेसाठी ४६ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्याला आमचे दुमत नाही. मात्र, शेतकऱ्यांचे हित व समृद्धीसाठी सरकारने कर्ज काढावे. मात्र, तसे होत नाही. सरकार महागाई वाढवून कररुपाने जनतेकडून वसूल करीत आहे. एकीकडे कर्जबाजारी झालेल्या सरकारवर का विश्वास ठेवावा? शेतकऱ्यांचे हितही महत्त्वाचे आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
उपसा सिंचन योजना प्रस्तावित
शेळगाव मध्य प्रकल्पात उपसा सिंचन योजना प्रस्तावित केली आहे. त्यामुळे यावल तालुक्यातील शेळगाव येथे उपसा सिंचन योजनेंतर्गत शेतापर्यंत पाणी जाणार आहे. त्यामुळे कापूस, केळी, ऊसालाही मुबलक पाणी मिळेल. मासेमारी, पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. पाइपलाइनद्वारे प्रत्येकाच्या शेतापर्यंत पाणी पोहोचणार आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, शासनाने या प्रकल्पाला निधी द्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. (latest marathi news)
माझ्या काळात तापी महामंडळाची स्थापना झाली. १९९८-९९ मध्ये शेळगाव प्रकल्पाचे भूमिपूजन आपल्याच हस्ते झाले. या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील २५ हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. तसेच भुसावळ, दीपनगर येथील पाण्याचा प्रश्नही सुटणार आहे. अंजाळे, पिळोद, कडगाव, शेळगाव याठिकाणी पूल झाल्यानंतर यावल तालुका जवळ येणार आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचा मोठा फायदा होईल. जिल्ह्यातील महत्त्वाच्या या प्रकल्पाची सुरुवात आपल्या कालखंडात झाली, याचा मनस्वी आनंद होत आहे, असेही त्यांनी सांगितले.
१० हजार कोटींवर प्रकल्प
त्या काळात या प्रकल्पासाठी १९८ कोटींची मान्यता देण्यात आली होती. मात्र, निधीअभावी या प्रकल्पाची किंमत १० हजार कोटी झाली आहे. केंद्र सरकारने बळीराजा योजनेतून या धरणाला निधी दिल्याने धरणाचे काम आता वेगाने सुरू होईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.