Jalgaon News : नेदरलँडच्या 'अल्मेरे'त घुमला शिवरायांचा जयजयकार; शिवराज्याभिषेक दिनी भगव्या पताका उंचावल्या

Jalgaon : सातासमुद्रापार नेदरलँडच्या भूमीत छत्रपतींचा जयजयकार घुमला. निमित्त होते शिवरायांच्या ३५० व्या राज्याभिषेक दिन सोहळ्याचे.
Bipin Patil, Swati Parmale, Nisha Patil, who participated in historical costumes on the day of Shivraj Abhishek.
Bipin Patil, Swati Parmale, Nisha Patil, who participated in historical costumes on the day of Shivraj Abhishek.esakal
Updated on

Jalgaon News : सातासमुद्रापार नेदरलँडच्या भूमीत छत्रपतींचा जयजयकार घुमला. निमित्त होते शिवरायांच्या ३५० व्या राज्याभिषेक दिन सोहळ्याचे. सातासमुद्रापार असलेल्या नेदरलँड या युरोपीय राष्ट्रात मराठी माणसांनी उभारलेल्या 'अल्मेरे महाराष्ट्र मंडळाने' शिवराज्याभिषेक दिन मोठ्या हर्षोल्हासात साजरा केला. भगव्या पताका हाती धरून ऐतिहासिक शिवकाळ जागा करत छत्रपतींचा जयघोष घुमला. (Marathi people in European nation of Netherlands celebrated Shivrajyabhishek Din )

ऐतिहासिक वेशभूषा साकारून शिवकालीन युद्ध कलेची चित्त थरारक प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली. महाराष्ट्रातून नेदरलँड देशात नोकरी व्यवसायानिमित्त गेलेल्या मराठीजनांनी अल्मेरे येथे महाराष्ट्र मंडळ स्थापन केले आहे. या मंडळाच्या माध्यमातून नेदरलँडमधील मराठी माणसांना एका धाग्यात बांधण्याची कार्य केले जात आहे.

अल्मेरे महाराष्ट्र मंडळ, विविध महाराष्ट्रीय परंपरा सांस्कृतिक सण, उत्सव साजरे करून आपली माती आणि नाती जपण्याचे कार्य करीत आहेत. अल्मेरे महाराष्ट्र मंडळाची स्थापना नेदरलँड्समध्ये स्थायिक बिपीन पाटील (मुंबई), दीपाली पाटील (बुलढाणा), उदय परमाळे, स्वाती परमाळे (पुणे) आणि हर्षद इनामदार व कीर्ती इनामदार (कोल्हापूर) यांनी केली. (latest marathi news)

Bipin Patil, Swati Parmale, Nisha Patil, who participated in historical costumes on the day of Shivraj Abhishek.
Jalgaon News : सातपुड्यासह पायथ्यावर बागायतीत वाढ; कुपनलिकांसाठी सौरऊर्जेचा वापर

विशेष म्हणजे नेदरलँड्समधील अल्मेरे येथे झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्यात जामनेर तालुक्यातील टाकरखेडा येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत कार्यरत असलेले ग्रेडेड मुख्याध्यापक पी. टी. पाटील यांची कन्या निशा पाटील यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमास स्वप्नील पाटील (पनवेल), पी. टी. पाटील आणि मिराबाई पाटील (जामनेर) तसेच महाराष्ट्रातून शेकडो लोक उपस्थित होते.

''नेदरलँडसारख्या युरोपीय राष्ट्रात छत्रपती शिवरायांचा जयघोष कानी पडताच मन भरून आले. आपण सातासमुद्रापार नसून आपल्याच मायभूमीत असल्याचा भास होत होता.''- पी. टी. पाटील, जामनेर

Bipin Patil, Swati Parmale, Nisha Patil, who participated in historical costumes on the day of Shivraj Abhishek.
Jalgaon News : शाळेच्या पहिल्याच दिवशी 27 हजार विद्यार्थ्यांना पुस्तके; शिक्षण विभागाचे नियोजन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.