जळगाव : वीजबिल थकल्याने ६७ गावे अंधारात

अमळनेर तालुक्यात पथदीपांचे चार कोटी ९५ लाख थकीत; नागरिक त्रस्त
Jalgaon Amalner taluka 67 villages power cut due to electricity bill
Jalgaon Amalner taluka 67 villages power cut due to electricity billsakal
Updated on

पातोंडा : मागील तीन दिवसांपासून पातोंडासह अमळनेर झोन दोनमधील १४० पैकी ६७ गावांच्या पथदीपांचा वीजपुरवठा ‘महावितरण’ने खंडित केल्यामुळे ही सर्व गावे अंधारात बुडाली आहेत. पथदीपांचे चार कोटी ९५ लाख रुपयांचे वीजबिल थकल्याने महावितरणने हा निर्णय घेतल्याचे समजते.

दरम्यान, आठ महिन्यांपूर्वी पातोंडा व परिसरातील गावे अंधारात बुडाली होती. ग्रामविकास अधिकारी बी. वाय. पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, पथदीपांचे वीजबिल राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून परस्पर ‘महावितरण’ला अदा केले जाते. मात्र, मागील तीन ते चार वर्षांत ही थकबाकी कोटींच्या घरात पोचली. या वर्षीही ग्रामपंचायतीच्या १५ व्या वित्त आयोगातून वीजबिले शासन ‘महावितरणा’ ला देईल. शासन लवकरच व्यवस्था करेल. ग्रामपंचायत दिवाबत्ती कर आकारणी करते. पातोंडा ग्रामपंचायतीकडे जवळपास २४ लाख रुपये थकबाकी आहे. दिवाबत्ती करापोटी गावात दोन लाख रुपये थकबाकी असून, दिवाबत्ती कराची वार्षिक वसुली फक्त ७ ते ८ टक्के आहे.

पथदीपांचे वीजबिल आकारणी करण्याची कोणतीही तरतूद नसल्याने ग्रामनिधीतून वीजबिल भरता येणे शक्य नाही. ग्रामनिधीतून वीजबिल भरण्याची तरतूद झाली, तर ग्रामपंचायतींची आर्थिक घडी विस्कटण्याची भीती निर्माण होत आहे. ही अवस्था प्रत्येक ग्रामपंचायतीची असून, शासनाने यावर योग्य ते मार्गदर्शन करावे, अशी मागणी ग्रामसेवक वर्गातून होत आहे.

पथदीप बंद असल्याने गावात अंधाराचा फायदा घेत चोरीच्या घटनांमध्ये वाढ होईल, अशी भीती ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. काही अनुचित प्रकार घडल्यास यास नेमके कुणाला जबाबदार धरावे, असा सवाल ग्रामस्थांमधून विचारला जात आहे. अमळनेर झोन दोनमधील ६७ गावांकडे पथदीपांचे जवळपास चार कोटी ९५ लाख रुपये थकीत असल्याने ‘महावितरण’ने पथदीपांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेतला आहे.

-मनोज पवार, उपकार्यकारी अभियंता, अमळनेर

ग्रामपंचायत पथदीपांच्या वीजबिलांची मागील थकबाकी शासन ‘महावितरण’ला अदा करणार असून, शक्यतो एप्रिल २०२२ पासून प्रत्येक ग्रामपंचायतीने आपापले पथदीपांचे मासिक वीजबिल ग्रामनिधीतून भरण्याची तरतूद करावी लागणार आहे.

-एकनाथ चौधरी, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, अमळनेर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.