Jalgaon News : आमदारांनी एकही पुरावा दिल्यास राजकीय संन्यास : अमोल शिंदे

Jalgaon : जिल्हा बँकेच्या शेतकरी कर्ज धोरणासंदर्भात मंत्री महाजनांच्या माध्यमातून प्रयत्न करून न्यायाची भूमिका मी घेतली. आमदार संचालक असल्यामुळे त्यांचा उल्लेख केला.
Amol Shinde
Amol Shindeesakal
Updated on

Jalgaon News : जिल्हा बँकेच्या शेतकरी कर्ज धोरणासंदर्भात मंत्री महाजनांच्या माध्यमातून प्रयत्न करून न्यायाची भूमिका मी घेतली. आमदार संचालक असल्यामुळे त्यांचा उल्लेख केला. पण आमदारांनी माझ्या एकही प्रश्नाचे उत्तर न देता वैफल्यग्रस्ततेने माझी शाळा व वैयक्तिक आरोप केले. आमदारांनी दिलेले सर्व आव्हान मी स्वीकारले आहे. पण ‘मातोश्री’ व माझ्या संपर्काबाबतचा एकही पुरावा आठवडाभरात आमदारांनी दिल्यास मी राजकीय संन्यास घेईन; अन्यथा आमदारांनी राजकीय संन्यास घ्यावा, असे खुले आव्हान भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी आमदार किशोर पाटील यांना दिले. (Political renunciation if MLA give any proof Amol Shinde )

आमदार किशोर पाटील यांनी शुक्रवारी (ता. १४) पत्रकार परिषद घेऊन अमोल शिंदे यांच्यासंदर्भात काही विधाने केली होती. या विधानांच्या स्पष्टीकरणासाठी अमोल शिंदे यांनी शनिवारी (ता. १५) सायंकाळी भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेत पत्रकही प्रसिद्धीस दिले. या वेळी बन्सीलाल पाटील, दीपक माने, प्रदीप पाटील, अरुण पवार, संजय पाटील, समाधान मुळे, मुकेश पाटील, जगदीश पाटील आदी उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, की आमदार सध्या वैफल्यग्रस्त झाले असल्याने पातळी सोडून टीका करीत आहेत. मी युती सरकार अथवा नेत्यांवर आरोप केलेले नाहीत. लोकप्रतिनिधी म्हणून शेतकऱ्यांसाठी ज्या गोष्टी करायला हव्यात, त्या त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. मुख्यमंत्र्यांच्या जवळचे नाही तर स्वतःच मुख्यमंत्री असल्याचे आमदार म्हणतात, मग आपला पाचोरा व भडगाव तालुका दुष्काळग्रस्त घोषित का नाही? नादुरुस्त हवामान केंद्रांमुळे शेतकऱ्यांना पीकविम्यापासून वंचित राहावे लागते.

नवीन हवामान यंत्र मिळावे, ही आमची मागणी आहे. परंतु आमदारांना एडब्ल्यूएस व पीओसीआरए याचा अर्थदेखील सांगता येणार नाही. शेतकऱ्यांना कापूस बियाणे, खते ज्यादा पैसे देऊन मिळत नाहीत. यांचा मुबलक पुरवठा व्हावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. परंतु आमदार चकार शब्द बोलत नाहीत. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी आपण कोणता प्रश्न मांडला? काय आवाज उठवला? हे माहीत आहे. (latest marathi news)

Amol Shinde
Jalgaon News : गुन्हे शाखेचे शिवधनुष्य पेलणार निरीक्षक बबन आव्हाड; चाचपणीसाठी अतिरिक्त कार्यभार

ज्या माझ्या शाळेवर आमदार टीका करतात, त्या शाळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते विभागीय ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे व गिरीश महाजन यांनी मला दुसऱ्यांदा सलग तालुकाध्यक्ष पद दिले. विधानसभा निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी दिली. याउलट आपण देवेंद्र फडणवीसांच्या शारीरिक व्यंगात्मक, बावनकुळे यांच्या आडनावावरून व गिरीश महाजन यांच्यावर टीका करताना किती खालच्या पातळीची भाषा वापरली आहे, हे आठवावे.

...तर दूध का दूध, पानी का पानी!

लोकसभा निवडणुकीत आमदारांनी युती धर्म पाळला नाही. त्यांनी विरोधात काम केले. स्वतःच्या अंतुर्ली गावात स्मिता वाघ यांच्या विरोधी उमेदवाराला मताधिक्य मिळवून दिले. याचे सर्व पुरावे वरिष्ठ नेत्यांपर्यंत गेले आहेत. उन्मेष पाटील व करण पवार यांच्यासोबत मी ‘मातोश्री’वर उपस्थित होतो, असा आरोप करणाऱ्या आमदारांनी आठवडाभरात एकही पुरावा दिला, तर मी राजकीय संन्यास घेईल; अन्यथा आमदारांनी राजकीय संन्यास घ्यावा, असे खुले आव्हान देऊन २०१९ च्या निवडणुकीत मी अपक्ष लढलो, आताही लढणार.

माझी भाजपची पदे राहतील की नाही, याची चिंता आपण करू नये. मी अपक्ष लढतो. आपणही माझ्याविरोधात अपक्ष म्हणून लढावे किंवा आपण धनुष्यबाणावर लढा, मी कमळ चिन्हावर लढतो व ‘दूध का दूध... पानी का पानी’ होऊन जाऊ द्या, असे खुले आव्हान अमोल शिंदे यांनी दिले.

Amol Shinde
Jalgaon News : पोलिस भरतीत उमेदवाराच्या पायात मायक्रो चीप : अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.