Edible Oil Price Hike : तेलाच्या डब्यामागे 150 ते 200 रुपयांची वाढ; नवरात्रोत्सव, दिवाळीतही तेजीचा अंदाज

Edible Oil Price Hike : जिल्ह्यात नवरात्रोत्सव व दिवाळीचा सण तोंडावर असतानाच खाद्य तेलाच्या किमतीत डब्यामागे सरासरी १०० ते १५० रुपयांनी वाढ झाली आहे.
Edible Oil Price Hike
Edible Oil Price Hikesakal
Updated on

जळगाव : जिल्ह्यात नवरात्रोत्सव व दिवाळीचा सण तोंडावर असतानाच खाद्य तेलाच्या किमतीत डब्यामागे सरासरी १०० ते १५० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे. तेलाचे भाव किलो मागे तब्बल २० ते २५ रुपयांनी वाढले आहे. खाद्यतेलाचे भाव वाढल्याने स्वयंपाक घरातील फोडणी महागली असून, सर्वसामान्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. केंद्र सरकारने कच्च्या व रिफाइंड खाद्यतेलांवरील मूळ आयात करात २० रुपयांनी वाढ केली आहे. (An increase of Rs 150 to Rs 200 per can of oil due to festival )

सोबत दोन टक्के सेल्स असे २२ टक्के वाढ झालेली आहे. याचा फटका खाद्यतेलाच्या दरावर झाला आहे. त्याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसला आहे. कच्चे सोयाबीन, पाम तेल, सूर्यफूल तेलावरील आयात शुल्कात २० टक्के वाढ, तर रिफाइंड सूर्यफूल, सोयाबीन तेलावरील आयात शुल्क ३५.७५ टक्के वाढवले आहे, तर खाद्यतेलात अचानक किलोमागे २० ते २५ रुपयांची वाढ झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. आगामी काळात नवरात्रोत्सव व दिवाळीमुळे तेलाचा वापर वाढणार आहे. अशात खाद्यतेलाचे भाव किलोमागे २० से २५ रुपयांनी वाढल्याने घरा-घरांत फोडणीचा ठसका उडणार आहे.

दीडशे रुपये किलोमागे वाढीचा अंदाज

तेलाचे भाव १५० रुपये प्रतिकिलोपर्यंत वाढण्याची शक्यता जाणकारांतून व्यक्त होत आहे. केंद्र सरकारने कच्च्या व रिफाइंड खाद्यतेलावरील मूळ आयात करात २२ टक्क्यांनी वाढ केल्याची घोषणा करताच व्यापाऱ्यांनी खाद्य तेलाच्या किमती वाढवल्या असल्याचे निदर्शनास आले आहे. सूर्यफूल, सोयाबीन व पाम तेलाच्या किमती १५ किलो डब्यामागे सरासरी १५० ते २०० रुपये वाढल्या आहेत. सूर्यफूल जुना दर १,७५० रुपयांचा डब्याचा होता, आताचे दर २,१०० रुपये, सोयाबीन डब्याचा जुना दर १,६०० रुपये व आताचे दर २००० रुपये, पाम तेल जुना दर १,६०० व आताचे १,८०० रुपये दर आहेत. (latest marathi news)

Edible Oil Price Hike
Edible Oil Price : खाद्यतेलावरील आयात करात २० टक्क्यांनी वाढ; स्वयंपाकघरातील फोडणी महागणार

किलोचे दर असे रुपये (कंसात पूर्वीचे दर)

शेंगदाणे--१९५ (१९५)

सोयाबिन--११० (१३०)

सूर्यफुल--१२० (१३५).

''सध्या दसरा-दिवाळी दरवर्षी सणासुदीच्या तोंडावर खाद्यतेल दरवाढीचा भडका उडाला आहे. लिटरमागे २० ते २५ रुपयांची वाढ होऊन तब्बल १५ किलोच्या डब्या मागे १०० ते १५० रुपयांच्या दरवाडीने फटका बसला आहे. याचा घरगुती मासिक बजेटवर परिणाम होत आहे.''- प्रतीक्षा भावसार, गृहिणी, जळगाव.

''केंद्र सरकारने कच्चे तेलावरील आयात शुल्क वाढल्याने सूर्यफूल, सोयाबीन व पाम तेलाच्या किमतीही वाढल्या आहेत. पाम तेल, कच्चे सोयाबीनवरील आयात शुल्क २० टक्क्यांनी आयात वाढवले आहे. अधिक दोन टक्के सेल्स असे २२ टक्के वाढ झाली आहे. शेंगदाणा तेल वाढले नाही. मात्र, सोयाबीन, सूर्यफुल यांच्या दरात वाढ झाली आहे.''- हितेंद्र दोशी, संचालक, जळगाव तेल डेपो.

Edible Oil Price Hike
Edible Oil Price Hike : 8 दिवसात तेलाच्या किंमतीत 20 ते 25 प्रति किलोने वाढल्या... गृहिणी आणि गणेश भक्तांचे बजेट कोलमडले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.