Jalgaon News : सातपुड्याचे अस्तित्व टिकवतोय ‘अंजन’; ‘कुऱ्हाड बंद’बाबत जनजागृतीमुळे सकारात्मक चित्र

Jalgaon : खानदेशची उत्तर सीमा असलेला सातपुडा पहाड म्हणजे सात पूड असलेला पर्वत.
Anjan trees sustaining greenery in the first row of Satpura.
Anjan trees sustaining greenery in the first row of Satpura.esakal
Updated on

ॲड बाळकृष्ण पाटील : सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : खानदेशची उत्तर सीमा असलेला सातपुडा पहाड म्हणजे सात पूड असलेला पर्वत. त्याचे दोन-तीन पूड महाराष्ट्रात तर उर्वरित मध्य प्रदेशात आहेत. सद्यस्थितीला उन्हाळ्यातही सातपुड्याच्या बऱ्याच भागात हिरवीगार दिसणारी अंजनाची झाडी सातपुड्यात फिरताना लक्ष वेधून घेतात. अंजनला गेल्या काही वर्षांचा संदर्भ असून, त्यामुळेच सातपुड्यात आणि पायथ्यावरच्या गावांमध्ये जनावरे (गुरे) अधिक दिसून येतात. ( Anjan is sustaining existence of Satpura )

कधी काळी कुऱ्हाड चालल्याने अंजनची झाडे कमी होऊ लागली होती, मात्र सद्यस्थितीला कुऱ्हाड बंद झाल्याचे दिसत असून वाचलेले अंजन पहाडाचे अस्तित्व टिकवताना दिसून येत आहेत. सातपुड्यात असलेल्या वृक्षामुळे पायथ्यावर असलेली अनेक दुभती गुरे आजही टिकून आहेत. म्हशी पाळून दुधाचा व्यवसाय करणाऱ्यांची आजही अंजनच्या पाल्यावर मदार आहे.

अंजन च्या पाल्याचा वापर पूर्वी पासून होत असला तरी आता मात्र तो किलोने विक्री होऊ लागला आहे. सातपुड्याच्या पूर्व भागातील मुक्ताईनगर पासून तर पश्चिम भागाच्या अक्कलकुव्यापर्यंत असलेल्या सातपुड्याच्या पहिल्या रांगेत अंजनची खूप झाडे आहेत. पायथ्यावरच्या गावांमध्ये अजूनही अंजन दिसून येतात. अंजनच्या पाल्याचा वापर आठ महिने होतो.

दोन-तीन महिने त्याला येणाऱ्या शेंगा म्हशीच्या दुधातील फॅट्स वाढवतात हेही दिसून आले आहे . त्यामुळे पहिल्या आणि दुसऱ्या रांगेत अनेक कामगार अंजन चा पाला तोडून त्याचा पायथ्यावरील गावांमध्ये किलो प्रमाणे विक्री करताना आजही दिसून येतात. अंजनाचा पाला सरकी व ढेपेच्या तोडीचा असून तो हिरवा चारा म्हशींना खाऊ घालतात. त्यामुळे पोषक व गुणकारी असल्यामुळे फॅट वाढून दुधाचे दरही चांगले मिळतात. (latest marathi news)

Anjan trees sustaining greenery in the first row of Satpura.
Jalgaon News: समांतर रस्त्यावर वाहने सुसाट! पारोळ्यात ‘अंडरपास’जवळच्या गतिरोधकांची मागणी; अपघाताला आमंत्रण

सहा सात दशकाचा विचार करता सातपुड्यात आणि पायथ्यावर घरची शेती नसताना गुरे मालक याच पाल्याचा वापर करत दुग्ध व्यवसायात दिसून येतात .पाला तोडल्याने झाडाचे काहीच नुकसान होत नाही आणि पुन्हा तो पाला पुढील हंगामात येतो. त्यामुळे हा वापर जास्त होताना दिसून येतो. तसा सातपुडा म्हणजे अंजनच्या पाल्याचे आगारच आहे.

सातपुड्यात मधल्या काळात कुऱ्हाड चालली आणि सातपुडा बोडका झाला, मात्र त्यात टिकून असलेली अंजन ची झाडी आजही हिरवीगार दिसत असल्याने तेच पहाडाचे अस्तित्व टिकवत आहेत. गेल्या पन्नास वर्षांपूर्वीचा इतिहास पाहता सातपुड्याच्या पायथ्यावरील गावांमध्ये असलेली जुनी घरे आजही अंजनच्या लाकडापासून बनवल्याचे दिसून येतात.

घराचा खांब, साऱ्यामध्येही ‘अंजन’

घराचा खांब, साऱ्या, अंजनचे असल्याचे अनेक घरे आजही पायथ्यावर आहेत. त्याचप्रमाणे जुन्या काळातील लाकडी कपाटी आजही अनेक कुटुंबांकडे असून टणक व दणकट असलेला अंजन त्या काळापासूनच वापरात येत असल्याचे दिसून येते. उन्हाळ्यात तसे पाहता झाडे शुष्क होतात आणि पहाड सुद्धा बोडका दिसू लागतो. मात्र आजच्या घडीला अंजनच पहाडाचे अस्तित्व टिकवत असून त्यानिमित्त सातपुड्यातली हिरवाई थोडीफार का होईना दिसून येते.

Anjan trees sustaining greenery in the first row of Satpura.
Jalgaon News : 6 एकरवरील मका आगीत खाक; शेतकऱ्याचे 9 लाखांचे नुकसान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.