Jalgaon Rain Update : अंजनी प्रकल्पाची शंभरीकडे वाटचाल! पाण्याची समस्या सुटली; रब्बी हंगामातील पिकांना होणार फायदा

Latest Rain Update News : अजूनही पाण्याची आवक सुरुच असल्याने प्रकल्पाची शंभरीकडे सुरु असलेली वाटचाल दिलासादायक ठरली आहे.
Increase in water storage in Anjani project.
Increase in water storage in Anjani project.esakal
Updated on

एरंडोल : शहरासह ग्रामीण भागातील अनेक गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या पळासदड (ता. एरंडोल) येथील अंजनी मध्यम प्रकल्पात पाण्याची आवक वेगाने सुरु आहे. प्रकल्पात गुरुवारी (ता. २६) सकाळपर्यंत जवळपास ७८ टक्के पाणीसाठा झाला आहे. अजूनही पाण्याची आवक सुरुच असल्याने प्रकल्पाची शंभरीकडे सुरु असलेली वाटचाल दिलासादायक ठरली आहे. (Anjani Project moving towards 100 percent)

अंजनी प्रकल्पातून शहरासह कासोदा व परिसरातील आठ गावांना पाणीपुरवठा केला जातो. यावर्षी पावसाळा संपत आला तरी प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ होत नसल्याने पाण्याची समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. मात्र, एक महिन्यापासून अंजनी नदीच्या उगमस्थळ परिसरात चांगला पाऊस होत आहे. ज्यामुळे या प्रकल्पात पाण्याची आवक सुरु झाली असून जलसाठ्यात झपाट्‍याने वाढ होत आहे.

रब्बीसाठी होणार फायदा

अंजनी प्रकल्पातील जलसाठा शंभर टक्के झाल्यानंतर रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांसाठी या प्रकल्पातून सोडल्या जाणाऱ्या आवर्तनाचा फायदा होतो. सुमारे आठशे हेक्टर जमिनीला सिंचनाचा लाभ मिळतो. याशिवाय धरणगाव शहरात पाण्याची समस्या निर्माण झाल्यास अंजनी नदीपात्रातून पाणी सोडले जाते.

अंजनी प्रकल्पासह पद्मालय, भालगाव व खडकेसीम येथील तलावातही पूर्ण जलसाठा झाल्यामुळे यावर्षी रब्बीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याची शक्यता आहे. प्रकल्पात आज सकाळी आठपर्यंत ७८ टक्के जलसाठा झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पाण्याची आवक अशीच सुरु राहिल्यास, दोन ते तीन दिवसातच प्रकल्प शंभर टक्के भरण्याची शक्यता आहे. (latest marathi news)

Increase in water storage in Anjani project.
Nagpur Hit and Run Case : रितू मालूची न्यायालयीन कोठडीत रवानगी,मर्सिडिज कार अपघात प्रकरण : सीआयडीकडून मध्यरात्री अटक

गाळ उपशामुळे फायदा

अंजनी प्रकल्पाची पाण्याची पातळी २२५.३७ मीटर झाली असून एकूण जलसाठा १५.९२४ दश लक्ष घनमीटर इतका झाला आहे. यातील उपयुक्त जलसाठा १२.१५२ दश लक्ष घनमीटर इतका असल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. पावसाळ्यापूर्वी अंजनी प्रकल्पातील जलसाठा संपुष्टात आल्यामुळे प्रकल्पातून हजारो ब्रास गाळाचा उपसा करण्यात

आला आहे. ज्यामुळे प्रकल्पाची खोली वाढण्यास मदत झाली आहे. एकूणच तालुक्यातील सर्व प्रकल्पांमध्ये समाधानकारक जलसाठा झाल्याने शहरासह ग्रामीण भागातील पाण्याची समस्या दूर झाली आहे. तालुक्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस झालेला असल्याने पिकांची स्थिती समाधानकारक आहे. मुग, उडीद यासारख्या कडधान्याच्या उत्पादनात घट झाली आहे.

तालुक्यात यावर्षी काल प्रथमच जोरदार पाऊस झाल्यामुळे अंजनी नदीसह ग्रामीण भागातील नाले वाहत आहेत. बुधवारी (ता. २५) सायंकाळी शहरात जोरदार पाऊस झाल्याने प्रमुख रस्त्यांवर पाणी येऊन तीन ते चार मोटारसायकली वाहून गेल्या. अंजनी नदीला अद्यापपर्यंत पूर आलेला नसल्यामुळे पात्रातील घाण ‘जैसे थे’ आहे. परिणामी, पात्राला गटारीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

पुनर्वसनाचा प्रश्‍न अद्यापही प्रलंबित

अंजनी प्रकल्पाच्या वाढीव उंचीचे काम सुमारे पंधरा वर्षांपूर्वी पूर्ण झाले आहे. मात्र वाढीव उंचीत बुडीत होणाऱ्या हनुमंतखेडे, मजरे व सोनबर्डी या तीन गावांचे पुनर्वसन न झाल्यामुळे प्रकल्पात पूर्ण क्षमतेने जलसाठा करता येत नाही. तिन्ही गावांचे पुनर्वसन झाल्यास प्रकल्पात पूर्ण क्षमतेने जलसाठा होऊन एरंडोल व धरणगाव तालुक्यातील सुमारे पंचवीस हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. याबाबत शासकीय स्तरावर पाठपुरावा करण्याची मागणी होत आहे.

Increase in water storage in Anjani project.
Jalgaon News: गावकारभाऱ्यांचा सरकार दरबारी वाढला मान! भुसावळ तालुक्यात 39 सरपंच, उपसरपंचांना दुप्पट मानधनाचा मिळणार लाभ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.