अमळनेर/चोपडा : अमळनेर व चोपडा तालुक्यात गेल्या १८ व १९ ऑकक्टोबरला परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले. त्याचा विपरित परिणाम म्हणून या तालुक्यातील शेतपिकांचे आणि पर्यायाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. म्हणून जिल्ह्यात तातडीने दुष्काळ जाहीर करण्यात यावा, अशी मागणी शेतकरी व शेतकरी संघटनांच्या शिष्टमंडळांकडून करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार यांच्याकडे देण्यात आले. (Announce wet drought in district Demand at Amalner Chopda)