Jalgaon Banana News : केळी निर्यातीसाठी बनाना क्लस्टरसाठी प्रयत्न करू; ‘अपेडा’चे अध्यक्ष अभिषेक देव

Jalgaon Banana : जिल्हा प्रामुख्याने केळी उत्पादकांपैकी एक असून, बडवाणी, बऱ्हाणपूर, नंदुरबार, धुळे, सुरत, नर्मदानगर आदी जिल्ह्यांतील केळी उत्पादकांवर आधारित अर्थव्यवस्था मोठी आहे.
Apeda President Abhishek Dev, (from left) Ashish Aggarwal, Prashant Waghmare, Vasantrao Mahajan, Ajit Jain, Anil Jain, Vinita Sudhanshu, D. K. Mahajan, Amol Jawle
Apeda President Abhishek Dev, (from left) Ashish Aggarwal, Prashant Waghmare, Vasantrao Mahajan, Ajit Jain, Anil Jain, Vinita Sudhanshu, D. K. Mahajan, Amol Jawleesakal
Updated on

Jalgaon Banana News : जिल्हा प्रामुख्याने केळी उत्पादकांपैकी एक असून, बडवाणी, बऱ्हाणपूर, नंदुरबार, धुळे, सुरत, नर्मदानगर आदी जिल्ह्यांतील केळी उत्पादकांवर आधारित अर्थव्यवस्था मोठी आहे. यातून ग्रामीण भागात मोठा रोजगार निर्माण होतो. त्यादृष्टीने देशातील प्रमुख बनाना क्लस्टरपैकी जळगाव जिल्ह्यातही बनाना क्लस्टर असावे, यासाठी विशेष अहवाल तयार करून स्वत: केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू’, असे आश्वासन ‘अपेडा’चे अध्यक्ष अभिषेक देव यांनी दिले. (Jalgaon Apeda President Abhishek Dev statement of Will try for banana cluster for export )

ॲग्रीकल्चर प्रोसेस फूड प्रोडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ॲथोरिटी (अपेडा) व जैन इरिगेशन सिस्टीम्सतर्फे कस्तुरबा सभागृहात झालेल्या ‘बनाना ग्रोवर्स ॲन्ड एक्सपोटर्स मीट २०२४-२५’ मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, अपेडाचे व्यवस्थापक विनिता सुधांशू, महाराष्ट्र अपेडाचे प्रशांत वाघमारे, केळी उत्पादक संघाचे वसंत महाजन, अमोल जावळे, केळी निर्यातदार आशिष अग्रवाल, किरण ढोके, केळी तज्ज्ञ डॉ. के. बी. पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.

केळी गुणवत्ता आणि उत्पादनात भारत अग्रस्थानी आहे. जागतिक स्तरावर भारताचा निर्यात वाटा एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. प्रमुख निर्यातदार देशांमध्ये आपण १८ व्या क्रमांकावर आहोत. आपल्यापेक्षा लहान देश निर्यातीत पुढे आहेत. मागील वर्षाची भारताची केळी निर्यात २९०.९ मिलियन डॉलर्स होती. केळीची निर्यात एक बिलियनच्यावर कशी होईल, याबाबतची महत्त्वपूर्ण चर्चा जैन हिल्समध्ये अपेडा केळी उत्पादक व निर्यातदारांच्या बैठकीत झाली.

यासाठी पायाभूत सुविधांसह फ्रूटकेअर मॅनेजमेंटसाठी शेतकऱ्यांचे प्रशिक्षण, पॅक हाऊस, कोल्डस्टोअरेज, शेतातून पॅकहाऊसपर्यंत सुरक्षित, जलद व कमी किमतीत वाहतूक सुविधा निर्माण करण्यावरही चर्चा झाली. श्री. देव म्हणाले, की फ्रूट केअर मॅनेजमेंट, क्लिनिंग, उत्पादन क्षमता वाढविणे, आंतरराष्ट्रीय मानांकानप्रमाणे निर्यातक्षम केळी उत्पादनासाठी प्रयत्न करणे, ॲसेटचा पूर्ण क्षमतेने उपयोग करणे. (latest marathi news)

Apeda President Abhishek Dev, (from left) Ashish Aggarwal, Prashant Waghmare, Vasantrao Mahajan, Ajit Jain, Anil Jain, Vinita Sudhanshu, D. K. Mahajan, Amol Jawle
Jalgaon Banana News : रणरणत्या उन्हाचा केळी बागांना फटका; लोणीसह परिसरातील अडावद

जैन इरिगेशन केळी उत्पादकांसह फळ-भाजीपाला निर्यात करू पाहणाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ॲसेट आहे. अचूक तंत्रज्ञानाच्या वापरातून निर्यातक्षम उत्पादन घेतले पाहिजे. इराण, इराकसह आखाती देशांसह रशिया, युरोप व अन्य देशांत केळी निर्यातीला मोठी संधी आहे. त्यासाठी ब्रॅडिंग महत्त्वाचे आहे. जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष जैन म्हणाले, की वडील भवरलालजी जैन यांनी गांधीतीर्थ निर्माण केले.

गांधीजींनी ग्रामीण भारतात भविष्य बघितले. गांधीजींच्या या विचारांचा माझ्या वडिलांवर प्रभाव राहिला आहे. ‘ग्रामीण विकास घडला, तर भारत विकास साध्य करेल’, हे त्यांचे विचार जैन इरिगेशन आपल्या कृतीतून साध्य करीत आहे. केळी आरोग्य, रोजगार, विदेशी चलन मिळविण्याचे महत्त्वाचे साधन आहे. त्यासाठी गुणवत्तापूर्ण रोपांची व निर्यातक्षम वाणाची उपलब्ध हा महत्त्वाचा भाग आहे.

केळीसाठी स्वतंत्र केळी मिशन कार्यक्रम

विनिता सुधांशू म्हणाले, की महाराष्ट्रातील शेतकरी तंत्रज्ञान आत्मसात करण्यात अग्रस्थानी आहे. त्यातून उत्पन्न वाढीसाठी ते प्रयत्न करतात. जैन इरिगेशनसारख्या संस्था उच्च तंत्रज्ञानातून शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे कार्य करीत आहेत. अपेडाचे कार्य विस्तारित असून, ७०० च्यावर उत्पादनांमध्ये निर्यातीसंबंधित कार्य सुरू असते. केळीमध्ये गेल्या दहा वर्षांत निर्यातीचा वाटा वाढला आहे.

शेतकरी, निर्यातदारांशी मुक्त संवाद

बऱ्हाणपूर, बडवाणी, नंदुरबार, जळगावमधील साधारण ३०० केळी उत्पादक उपस्थित होते. प्रामुख्याने आशिष अग्रवाल, राजेंद्र पाटील, भागवत पाटील, प्रशांत महाजन, विशाल अग्रवाल, विशाल महाजन, भागवत महाजन, उमेश महाजन, बी. ओ. पाटील, अनिल पाटील, निर्यातदार अमीर करिमी, प्रशांत धारपुरे, युवराज शिंदे, महेश ढोके, शफी शेख, रवींद्र जाधव, अनिल परदेशी, प्रमोद निर्मळ, डॉ. अझहर पठाण आदी निर्यातदार उपस्थित होते.

Apeda President Abhishek Dev, (from left) Ashish Aggarwal, Prashant Waghmare, Vasantrao Mahajan, Ajit Jain, Anil Jain, Vinita Sudhanshu, D. K. Mahajan, Amol Jawle
Jalgaon Banana Damage : रावेर तालुक्यात वादळी तडाख्यात 51 कोटींची केळी भुईसपाट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.