Jalgaon Municipality News : मोठ्या नाल्यांची सोमवारपासून सफाई; जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी

Jalgaon : शहरातील नाल्यांचे पाणी पावसाळ्यात तुंबून कोणतीही आकस्मिक घटना घडू नये, यासाठी महापालिकेतर्फे पावसाळा पूर्व नाले सफाईचे काम सुरू झाले आहे.
Jalgaon Municipal Corporation
Jalgaon Municipal Corporation esakal
Updated on

Jalgaon Municipality News : शहरातील नाल्यांचे पाणी पावसाळ्यात तुंबून कोणतीही आकस्मिक घटना घडू नये, यासाठी महापालिकेतर्फे पावसाळा पूर्व नाले सफाईचे काम सुरू झाले आहे. शहरातील मोठे नाले सफाईची निविदा लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी निविदा काढण्यास परवानगी दिल्याने महापालिकेने प्रक्रिया सुरू केली आहे. सोमवार (ता. २०)पासून मोठ्या नाल्यांची सफाई सुरू होणार आहे. (Approval from Collector Cleaning of major drains from Monday )

जळगाव शहरातील सांडपाणी वाहून जाण्यासाठी विविध भागांत नाले तयार केले आहेत. शहरातील गटारींचे पाणी नाल्यात जाते व तेथून ते मोठ्या नाल्यात जाते. जळगाव शहरात एकूण १०७ नाले आहेत. त्यात १०२ लहान, तर पाच मोठे नाले आहेत. शहरातील लेंडी नाला सर्वांत मोठा आहे. त्याचप्रमाणे औद्यौगिक वसाहतीतील नाला, खंडेरावनगरातील नाला, खोटेनगराजवळील नाला, पिंप्राळा भागातील नाला हे पाच मोठे नाले आहेत.

महापालिकेतर्फे पावसाळ्यापूर्वी दरवर्षी नाले सफाई करण्यात येते. शहरातील लहान नाल्यांची सफाई महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात येते. त्यासाठी महापालिकेने मिनी जेसीबी घेतलर आहे. त्या माध्यमातून ही सफाई करण्यात येते. त्यासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती केली आहे. या नाल्यांची सफाई सुरू झाल्याचे महापालिकेतर्फे सांगण्यात आले. (latest marathi news)

Jalgaon Municipal Corporation
Jalgaon News : खासगी मराठी शाळांची विद्यार्थी शोधमोहीम! शिक्षकांची घरोघरी भटकंती

शहरातील पाच मोठ्या नाल्यांची सफाई महापालिकेच्या बांधकाम विभागातर्फे करण्यात येते. मक्तेदारांच्या माध्यमातून ही सफाई करण्यात येते. त्यासाठी महापालिकेतर्फे निविदा काढण्यात येतात. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या आचासंहितेमुळे ही प्रक्रिया अडकली होती. महापालिकेने जिल्हाधिकाऱ्यांकडे विनंती अर्ज करून निविदा प्रक्रिया राबविण्याची परवानगी मागितली. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी त्याला मंजुरी दिली असून, महापालिकेने ताबडतोब ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. आता सोमवार (ता. २०)पासून मोठ्या नाल्यांची सफाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

''शहरातील लहान नाल्यांची सफाई महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे सुरू आहे. मोठ्या पाच नाल्यांच्या सफाईची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सोमवार (ता. २०)पासून सफाई सुरू करण्यात येईल. पावसाळ्यापूर्वी सर्व नाल्यांची सफाई पूर्ण करण्यात येईल.''-चंद्रकांत सोनगिरे, शहर अभियंता, महापालिका, जळगाव

Jalgaon Municipal Corporation
Jalgaon News : पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून; 5 दिवसांनी लागला छड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.