Jalgaon News : सातपुडा पहाडातील मजूर कामाच्या शोधात सपाटीवर!

Jalgaon News : सद्यःस्थितीत सातपुडा पहाडात मजुरांसाठी काहीच काम नसल्याने या भागातील मजूर कामाच्या शोधात सपाटीवरील गावांमध्ये आले आहे.
tribal labourers came from Satpura Hills in search of work
tribal labourers came from Satpura Hills in search of workesakal
Updated on

गणपूर (ता चोपडा ) : सद्यःस्थितीत सातपुडा पहाडात मजुरांसाठी काहीच काम नसल्याने या भागातील मजूर कामाच्या शोधात सपाटीवरील गावांमध्ये आले आहे. सातपुडा पहाडातील पर्वतरांगांमध्ये वसलेल्या गावांमध्ये या दिवसात बागायती क्षेत्र नसल्याने मजुरांसाठी येणाऱ्या खरीप पेरणीपर्यंत कुठलेच काम नसल्याने मजूरांच्या कुटुंबावर स्थलांतराची वेळ आली आहे. (Jalgaon As there is no work for laborers in Satpura Hills local laborers have come to villages in search of work)

सध्या सातपूड्याच्या पहाडपट्यात शुकशुकाट असल्याने हे मजूर घरीच असतात.त्यामुळे काम करून काहीतरी कमावता येईल हा उद्देश घेऊन हे मजूर आपले बिऱ्हाड डोक्यावर घेऊन सपाटीवरील गावांमध्ये दोन-तीन महिन्यांसाठी येत असते.

सद्यस्थितीत खानदेशातील अक्कलकुवा, खापर ,तळोदा, शहादा ,शिरपूर ,चोपडा ,यावल, भुसावळ,मुक्ताईनगर या सातपुडा लगत असलेल्या तालुक्यांच्या उत्तर सिमेकडील पर्वत रांगांमधील गावांमध्ये असलेले मजूर सध्या मिळेल त्या कामासाठी सपाटीवरील गावांमध्ये आलेले आढळून आले आहे. (latest marathi news)

tribal labourers came from Satpura Hills in search of work
Jalgaon Lok Sabha Constituency : ‘ग्लोबल’ विरुद्ध ‘लोकल’ प्रारंभिक प्रचाराच्या मुद्यांचा संघर्ष

शेतीकामावर गुजराण

मजुरांकडून सध्या कांदा काढणी, मका कापणी व काढणी, ज्वारी ,बाजरी कापणी, खतांची वाहणी ,मूग तोडणी ,कडबा कुट्टी वाहने ,भुईमूग उपटणी यासह शेती तयार करणे यासह यावलकडील भागात केळी पिकातील कामे व अन्य मिळतील ती कामे या मजुरांकडून केली जात असल्याने त्यांना रोख रकमेसह ज्वारी बाजरी मिळत असल्याने पावसाळ्यातील खाण्यापिण्याची सोयही होणार आहे.

हे मजूर सध्या ठराविक रकमेवर किंवा रोजंदारीने काम करत असून त्यांना दिवसाकाठी अडीचशे ते चारशे रुपये रोज मिळत असल्याने पावसाळ्यातील खर्चाची तरतूद होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर उन्हाळा ही पास होणार आहे . त्यामुळे सपाटीवरील बऱ्याच भागात आदिवासी भागातील मजूर येऊन काम करत असल्याचे दिसून आले .

tribal labourers came from Satpura Hills in search of work
Jalgaon Lok Sabha Election : प्रा. मनोज पाटील यांच्या प्रवेशामुळे एकनाथ शिंदे गटाची ताकद वाढणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.