Jalgaon Assembly Constituency: शिवसेनेला हव्यात जिल्ह्यात 6 जागा; महायुती, महाविकास आघाडीतही जागा वाटपावरून रस्सीखेच

Assembly Constituency : लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेचे वारे आता सर्वत्र वाहू लागले आहेत.
Assembly Constituency
Assembly Constituency esakal
Updated on

Jalgaon Assembly Constituency : लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेचे वारे आता सर्वत्र वाहू लागले आहेत. राज्यातील महायुती, महाविकास आघाडीतही आता जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू झाली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेने ‘भाजप’ला मदत करीत जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघातील दोन्ही उमेदवारांना मताधिक्क्यांनी निवडून आणण्यासाठी मदत केली. (Assembly Constituency Shiv Sena wants 6 seats in district )

आता विधानसभेत ‘भाजप’ने मोठ्या मनाने विधानसभेच्या सहा जागा द्याव्यात, अशी मागणी शिवसेनेचे पदाधिकारी करू लागले आहेत. सध्या जळगाव जिल्ह्यात भाजपकडे जळगाव शहर, जामनेर, भुसावळ, चाळीसगाव ही चार विधानसभा मतदारसंघ आहेत. शिवसेनेकडे जळगाव ग्रामीण, चोपडा, एरंडोल-पारोळा, पाचोरा मतदारसंघ आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) पक्षाकडे अमळनेर, कॉंग्रेसकडे रावेर-यावल मतदारसंघ आहे.

मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार अपक्ष म्हणून निवडून आले होते. ते आता शिवसेनेसोबत आहेत. लोकसभा निवडणुकीत शिवसेने मदत करून भाजपच्या उमेदवारांना निवडून आणावे, विधानसभेत आम्ही त्यांना (शिवसेनेला) मदत करू, असा शब्द दिला होता. तो भाजपने पाळावा, अशी भावना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची आहे. विधानसभा निवडणुकीत सहा जागा मिळाव्यात, अशी मागणी जोर धरत आहे. (latest marathi news)

Assembly Constituency
Nashik Assembly Constituency : पश्चिम विधानसभा मतदारसंघात नवीन चेहऱ्याचा शोध; जुन्या- नव्या उमेदवारांचे गुडघ्याला बाशिंग

महायुतीत अद्याप जागावाटप बाकी असले, तरी शिवसेनेने आपला सहा जागांवर दावा सांगितला आहे. वेळप्रसंगी अकराही मतदारसंघात निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. शिवसेनाप्रमुख तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगतील, त्याप्रमाणे विधानसभा लढवू. मात्र, शिवसेना वाढीसाठी जादा जागांची मागणी असेल.

पाचोऱ्यात कारवाईची मागणी

मागील विधानसभेत ‘भाजप’ने काही ठिकाणी शिवसेनेविरोधात डमी (अपक्ष) उमेदवार उभे केले होते. आता मात्र पाचोरा विधानसभा मतदारसंघात भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांच्याविरोधात निवडणुकीत उभे राहण्याची तयारी करीत आहेत. आमदार पाटील यांच्याविरोधात ते बोलत आहे. भाजपचे नेते, मंत्री गिरीश महाजन अमोल शिंदे यांच्यावर कारवाई का करीत नाही? त्यांनी दिलेला शब्द का पाळत नाही, असा प्रश्‍न शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नीलेश पाटील यांनी उपस्थित केला आहे.

''जळगाव जिल्ह्यात शिवसेनेला सहा जागा मिळायलाच पाहिजे. लोकसभेत आम्ही भाजपला मताधिक्य मिळवून दिले होते. जागावाटप अजून ठरलेले नाही. मात्र, जादा जागांची मागणी आहे. मतदारांचा वाढता प्रतिसाद पाहता स्वतंत्र लढण्याची तयारीही सुरू केली आहे.''-नीलेश पाटील, जिल्हाप्रमुख, शिवसेना

Assembly Constituency
Jalgaon Assembly Constituency : विधानसभेच्या जागांवरून महाविकास आघाडीत रस्सीखेच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.