जळगाव : जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघांत बुधवारी (ता. २०) सकाळी सात ते सायंकाळी पाचपर्यंत ५४.६९ टक्के मतदान झाले होते. सायंकाळी उशिरापर्यंत मतदान सुरू होते. शेवटच्या एक तासात ही टक्केवारी ६१ ते ६५ टक्क्यांपर्यंत जाईल, असा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे. दरम्यान, येत्या शनिवारी (ता. २३) सकाळी आठपासून संबंधित मतदारसंघांत मतमोजणी होणार आहे.