Jalgaon : नालीतील दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर; भुसावळमधील नागरिकांचे आरोग्या धोक्यात

Jalgaon : शहरातील खडका चौफुली महामार्गाच्या उड्डाणपुलाखाली नालीचे चेंबर जाम झाल्यामुळे सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे.
Drivers and citizens passing through sewage flowing from the road in Khadka Chowk.
Drivers and citizens passing through sewage flowing from the road in Khadka Chowk.esakal
Updated on

भुसावळ : शहरातील खडका चौफुली महामार्गाच्या उड्डाणपुलाखाली नालीचे चेंबर जाम झाल्यामुळे सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना तसेच तेथून ये- जा करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. या ठिकाणी स्वच्छतेचा अभाव असून सतत चेंबर तुंबत असल्याने सांडपाणी रस्त्यावरून वाहते. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नगरपालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन चेंबरची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. (Bad smelling water from drain threatens health of citizens of Bhusawal)

शहरातील खडका रोड हा भाग उच्चभ्रू नागरीकांच्या वस्तीचा भाग म्हणून ओळखला जातो. या भागातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ गेलेला आहे. याच महामार्गाच्या उड्डाणपुलाखाली परिसरातील रहिवाशांची घरे आहेत. परिसरातील इमारतींमधील सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी नगरपालिकेने गटारांची व्यवस्था केलेली आहे. मात्र, महामार्गाच्या उड्डाणपुलाजवळ नालीतील पाणी जाण्याच्या मार्गात अडथळे निर्माण झाल्यामुळे आतील पाणी अक्षरशः बाहेर रस्त्यावर वाहत आहे.

दुर्गंधीमुळे त्रास

नालीतील सांडपाणी शहरातून येणाऱ्या व महामार्गाच्या रस्त्यावर पसरले आहे. त्यामुळे ये- जा करणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. दुसरीकडे हे घाणीचे सांडपाणी जमिनीत झिरपत आहे. त्यामुळे रहिवाशांच्या पाण्याच्या भूमिगत टाक्याही प्रदूषित होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मागील काही महिन्यांपासून या समस्येला नागरिक सामोरे जात असून या पाण्याच्या दुर्गंधीमुळे आजूबाजूच्या परिसरात रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे. पालिकेने गटारांची स्वच्छता करावी तसेच सांडपाणी जाण्याचे स्त्रोत मोकळे करावेत, अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे. (latest marathi news)

Drivers and citizens passing through sewage flowing from the road in Khadka Chowk.
Jalgaon News : बऱ्हाणपूरजवळ रेल्वे रुळावर स्फोट; ‘डिटोनेटर्स’चा वापर

पालिकेबद्दल नाराजी

या संदर्भात नागरिकांनी पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. मात्र, या समस्यांचे कायमस्वरूपी निराकरण होत नसल्याने नागरिकांनी पालिकेच्या अनागोंदी कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. चेंबरमधील घाण पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने परिसरात दुर्गंधी तर पसरली आहे. शिवाय नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. पालिकेच्या संबंधित विभागाकडून तात्पुरत्या स्वरूपाची उपाययोजना केल्या जातात.

मात्र, चेंबर तुंबण्याची समस्या या ठिकाणी कायमची झाली आहे. नागरिकांची तसेच वाहनांची येथून मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. सांडपाणी रस्त्यावर आल्याने वाहने ये जा करताना नागरिकांच्या अंगावर घाण पाणी उडते. त्यामुळे येथील समस्येची पालिकेने तत्काळ दखल घेऊन परिसरातील चेंबर तुंबून घाण पाणी रस्त्यावरून वाहणार नाही, यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

''शहरातील खडका चौकातील सांडपाण्यासंदर्भात पालिकेच्या पथकाने पाहणी केली आहे. नागरीकांची गंभीर समस्या पाहता, या ठिकाणी लवकरच योग्य त्या उपाययोजना करुन हा विषय मार्गी लावला जाईल.''- रितेश बच्छाव, नगर अभियंता ः भुसावळ नगरपालिका

Drivers and citizens passing through sewage flowing from the road in Khadka Chowk.
Jalgaon Cotton : बोदवड तालुक्यात शिवारात कपाशीवर रोगाचा प्रादुर्भाव; शेतकरी संकटात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.