Jalgaon News : बाफना ज्वेलर्सच्या मालाची तपासणी अन्‌ ‘क्लीअरन्स’; आयकर विभागाकडून चौकशी

Jalgaon News : शनिवारी (ता. २०) सायंकाळची वेळ. कुसुंब्याजवळ एमआयडीसी पोलिस पथक एक वाहन थांबवते. वाहनात तब्बल ९ किलो सोन्याचे दागिने, १२ किलो चांदी, असा कोट्यवधींचा माल.
jewellery
jewelleryesakal
Updated on

Jalgaon News : शनिवारी (ता. २०) सायंकाळची वेळ. कुसुंब्याजवळ एमआयडीसी पोलिस पथक एक वाहन थांबवते. वाहनात तब्बल ९ किलो सोन्याचे दागिने, १२ किलो चांदी, असा कोट्यवधींचा माल. रितसर आयकर विभागाला कळविले जाते. विभागाचे अधिकारी २४ तास चौकशी करत सर्व कागदपत्रांची तपासणी करतात. सर्व व्यवहार नियमात आढळून आल्यानंतर ‘क्लीअरन्स’ देतात. (Jalgaon Bafna Jewellers goods inspection and clearance)

आर. सी. बाफना ज्वेलर्स जळगावसह राज्यातील विश्‍वासार्ह सुवर्णपेढी. या प्रतिष्ठानने मागविलेला माल मुंबईहून सिक्वेल या वाहतूक व सुरक्षा कंपनीच्या वाहनातून जळगावकडे येत होता. सध्या लोकसभेची आचारसंहिता सुरू असल्याने ठिकठिकाणी वाहनांची तपासणी सुरू आहे.

त्या अंतर्गत एमआयडीसी पोलिसांनी कुसुंबा गोशाळेजवळ हे वाहन थांबवले. त्यात ९ किलो सोन्याचे दागिने, एक सोन्याचे बिस्कीट व १२ किलो चांदी आढळून आली. चौकशीनंतर पोलिसांनी रितसर आयकर विभागाला याबाबत कळविले.

बाफना ज्वेलर्सकडे तपासणी

आयकर विभागाचे जळगाव व नाशिक येथील वरिष्ठ अधिकारी बाफना ज्वेलर्स प्रतिष्ठानवर शनिवारी सायंकाळीच आले. त्यांनी जो माल आढळून आला त्यासंबंधी कागदपत्रांची तपासणी केली. मालाची पर्चेस ऑर्डर, चलन, बिले, पेमेंटची पद्धती या सर्व बाबींची तपासणी सुरू केली. प्रतिष्ठानकडून सर्व प्रकारची कागदपत्रे अधिकाऱ्यांकडे सादर केली. ही संपूर्ण प्रक्रिया कशी चालते, याबाबतही अधिकाऱ्यांनी माहिती घेतली.

दिवस-रात्र चालली चौकशी

शनिवारी सायंकाळपासून ही चौकशी सुरू होती, ती रविवारी दुपारपर्यंत चालली. ही चौकशी सुरू असताना, आयकर विभागाने प्रतिष्ठानातील कोणत्याही सहकाऱ्याची चौकशी केली नाही. कागदपत्रांची पूर्तता, पडताळणी केल्यानंतर अधिकाऱ्यांची या संपूर्ण मालाची खरेदी. (latest marathi news)

jewellery
Jalgaon Sharad Pawar : व्यक्तिगत अडचणींमुळे खडसे भाजपत जाण्याच्या निर्णयापर्यंत : शरद पवार

त्यासंबंधी व्यवहाराबद्दल खात्री पटली व त्यांनी त्यासंबंधी ‘क्लीअरन्स’ दिला. या संपूर्ण प्रक्रियेद्वारे बाफना ज्वेलर्सच्या ग्राहकांशी व्यवहार करतानाची आणि स्वत:च्या व्यवहारातील पारदर्शिता आणि विश्‍वासार्हताही अधोरेखित झाली.

रतनलालजींची परंपरा पुढेही...

या प्रतिष्ठानचे संस्थापक रतनलाल बाफना यांनी सुवर्ण व्यवसायात आपल्या विश्‍वासार्हतेवर लौकिक प्राप्त केला. त्यांनी व्यवहारातही आदर्श घालून दिले होते. जीएसटी लागू झाल्यानंतर अनेक व्यावसायिकांनी त्यास विरोध केला.

मात्र, स्वत: रतनलालजींनी त्याचे स्वागत करत अशाप्रकारे कर चुकवून, टाळून काय मिळवून घेऊ. ‘रात को नींद तो आनी चाहिए’, अशी भावना व्यक्त केली होती. त्यांचीच ही आदर्श शिकवण त्यांची पुढची पिढीही आचरणात आणतेय, हे या व्यवहारातून सिद्ध झाले.

"आम्ही मागविलेल्या मालाची खरेदी ऑर्डर, बिले, पेमेंट यासंबंधी सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर आयकर विभागाला हा संपूर्ण व्यवहार पारदर्शी व नियमानुसार असल्याची खात्री पटली आहे." -मनोहर पाटील, जनसंपर्क अधिकारी, आर. सी. बाफना ज्वेलर्स

jewellery
Jalgaon News : राजकारणापलीकडे जाऊन ज्येष्ठांप्रति आदराचे दर्शन! विमानतळावर नेते-पदाधिकाऱ्यांची मांदियाळी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.