Jalgaon Banana Insurance : केळी पीक विमा प्रस्ताव परत पडताळणीचे आदेश कशासाठी? शेतकरी संघटनेचा सवाल

Banana Insurance : फळपीक विमा योजनेत कागदपत्रांची पडताळणी तालुका कृषी अधिकारी व तहसीलदारांनी करून जिल्हा समितीसमोर ठेवून जिल्हास्तरीय समितीनेही मान्यता दिली.
Banana Crop
Banana Cropesakal
Updated on

Jalgaon Banana Insurance : फळपीक विमा योजनेत कागदपत्रांची पडताळणी तालुका कृषी अधिकारी व तहसीलदारांनी करून जिल्हा समितीसमोर ठेवून जिल्हास्तरीय समितीनेही मान्यता दिली. आता परत कशाची पडताळणी करणार, असा प्रश्‍न उपस्थित करून केळी विमाधारक शेतकऱ्यांची थट्टा तत्काळ थांबविण्याची मागणी शेतकरी संघटनेचे विभागीय अध्यक्ष संदीप पाटील यांनी केली आहे. (Banana Crop Insurance Proposal Back Verification Order question of farmers association )

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दोन वर्षांपूर्वी हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत सहभागी जिल्ह्यातील दहा हजार ९२७ शेतकऱ्यांच्या पीकविमा रद्द केल्या होत्या. याबाबत दोन फेब्रुवारीला शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर शिंगाडे मोर्चा काढल्यावर १६ फेब्रुवारीला बैठक घेऊन ज्यांनी केळी असल्याचे पुरावे सादर केले, त्या सहा हजार ६८६ शेतकऱ्यांच्या पीकविम्यास जिल्हाधिकारी यांनी मंजुरी देत विम्याची रक्कम देण्याचे आदेश दिले होते.

मात्र, पाच महिन्यांनंतरही विम्याची रक्कम शेतकऱ्यांना न मिळाल्याने दहा जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडी शेतकरी संघटनेने तीन दिवस ठिय्या आंदोलन केले. तेव्हा संबंधित अधिकाऱ्यांनी १८ जुलैपर्यंत शेतकरी प्रतिनिधी व संबंधितांची पीकविम्यावर बैठक घेऊन तोडगा काढण्याचे पत्र दिले. मात्र, २४ जुलैला कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत पालकमंत्र्यांनी बैठक घेऊन मंजूर प्रस्ताव परत पडताळणीचे आदेश काढीत शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार केला आहे. (latest marathi news)

Banana Crop
Banana Crop Insurance : शेतकऱ्यांच्या खात्यात दमडीही नाही; दिवाळी अंधारात जाणार की काय?

म्हणजेच पात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मंजूर न करण्याची शासनाची मानसिकता दिसून येत आहे. केळी पीकविमा नुकसानभरपाई प्रलंबित असलेले सहा हजार ६८६ शेतकऱ्यांची शासन चेष्टा करीत आहे. यापूर्वी पडताळणी झालेली आहे. आता परत कशाची पडताळणी करणार, असा प्रश्‍नही शेतकरी संघटनेने केला आहे. केळी पीकविमा काढताना शेतकऱ्यांनी जिओ टॅग केलेले फोटो जोडलेले आहेत.

विमा मंजूर केल्यानंतर शेतकऱ्यांनी केळी लागवड केल्याचे पुरावे (७/१२ उतारा केळी पीकपेरा असलेला, जिओ टॅग केलेले फोटो), काही शेतकऱ्यांनी टिशूरोप खरेदी केल्याच्या पावत्या, केळी विक्रीच्या पावत्या, बँक खात्यात केळी विक्रीपासून जमा झालेले पैशाच्या पुरावे सादर केले आहेत. तरी पडताळणी म्हणजे शासन शेतकऱ्यांची चेष्टा करीत असून, वेळ मारून नेण्याचा प्रकार होत असल्याचेही निवेदनात संदीप पाटील यांनी म्हटले आहे.

Banana Crop
Jalgaon Banana Crop Insurance : केळी पीक विम्याची 6 हजार प्रकरण मंजूर : जिल्हाधिकारी प्रसाद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()