Jalgaon Accident News : दुभाजकाला टायर घासल्याने फुटून अपघात; 6 प्रवासी जखमी

Jalgaon News : एरंडोल-जळगाव दरम्यान पाळधी दरम्यान धावत्या खासगी प्रवासी बसचे टायर फुटून बस उलटल्याने झालेल्या अपघातात सहा प्रवासी जखमी झाले.
Guardian Minister Gulabrao Patil visited the incident site
Guardian Minister Gulabrao Patil visited the incident siteesakal
Updated on

Jalgaon News : एरंडोल-जळगाव दरम्यान पाळधी दरम्यान धावत्या खासगी प्रवासी बसचे टायर फुटून बस उलटल्याने झालेल्या अपघातात सहा प्रवासी जखमी झाले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन स्वतः जखमींना रुग्णालयात रवाना केले. खासगी प्रवासी वाहतूक.

करणारी लक्झरी बस सुरत (गुजरात) येथून अकोला जात असतांना आज शनिवार (ता.२७) सकाळी सातच्या सुमारास एरंडोल मार्गे पाळधी बायपास अगोदर साईबाबा मंदिर परिसरात टायर फुटल्याने बस रस्त्याच्या कडेला उलटली. त्यात पठाण गफ्फार खान (वय ४६, रा. सुरत) यांचे दोन्ही पाय फॅक्चर झाले.

कौतिक सुपडा गवळी (वय ५०, रा. सुरत), सोनू अंकुश मिस्तरी (वय२७, सुरत), आशाबाई सुभाष भोसले (वय४५, रा. सुरत), विद्या स्वामी निकडे (वय४०), अर्चना स्वामी निकडे (वय१२, रा. बुलढाणा) असे सहा प्रवासी जखमी झाले.

प्रवासी झोपेत अन्‌..

बहुतांश प्रवासी झोपेत असतानाच बस उलटल्याने प्रवासी भेदरुन किंचाळत होते. सोबतच्या कुटुंबीयांना तर, काय झाले नसावे या भीतीने आणि जिवाच्या आकांताने कलंडलेल्या बस मध्ये प्रवाशांची बाहेर पडण्यासाठी धावाधाव सुरु होती. कुटुंबीय सुखरूप असल्याने इतर प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला. (Latest Marathi News)

Guardian Minister Gulabrao Patil visited the incident site
Jalgaon Lok Sabha Constituency : उन्मेष पाटील यांचे पक्षांतर विरोधकांना यश देणार?

पालकमंत्री मदतीला

महार्मागाला लागूनच निवासस्थान असलेल्या पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना अपघाताची माहिती कळताच त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेत गावातील तरुण, रुग्णवाहिका, पाळधी औटपोस्टचे पोलिस व इतर वाहनांच्या मदतीने जखमींना उलटलेल्या बसमधून बाहेर काढत जळगाव जिल्‍हा रुग्णालयात रवाना केले.

टायर फुटल्याचे कारण..समजेना

अतिरिक्त तापमान आणि वेगामुळे वाहनांचे टायर उन्हाळ्यात फुटतात. मात्र सूर्योदयापूर्वीच हा अपघात घडल्याने तापमानामुळे टायर फुटल्याची शक्यता नाही. तर, अतिवेगात टायर दुभाजकाला घासून हा अपघात घडल्याचा प्रत्यक्षदर्शींचा दावा आहे.

Guardian Minister Gulabrao Patil visited the incident site
Jalgaon Banana Crop : केळीची आवक वाढली; दरात घट कायम; खानदेशातून रोज 8 कंटेनरची आखातात निर्यात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.