चाळीसगाव : नारपार योजना ही गिरणा खोऱ्याच्या समृद्धीसाठी महत्त्वाची योजना असताना केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी गुजरातकडे पाणी वळविण्याच्या हेतूने हा प्रकल्प नाकारला आहे. ही भूमिका गिरणा खोऱ्यातील शेतकऱ्यांच्या विरोधी भूमिका असून राज्यपालांचे पत्र हा फडणवीस यांचा निवडणूक जुमला आहे.
नारपारसाठी केंद्र सरकारच्या निधीतून प्रशासकीय मान्यतेची तरतूद करावी. ही आमची मागणी आहे. त्यामुळेच आज शेकडो ट्रॅक्टर घेऊन गिरणा खोऱ्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या एकजुटीने आंदोलन उभारले आहे. नारपार द्या अन्यथा राज्य सरकारला हद्दपार करू, असा इशारा माजी खासदार तथा शिवसेना नेते उन्मेष पाटील यांनी दिला. (Jalgaon Battle for Narpar Former MP Unmesh Patil tractor march at Chalisgaon marathi)