Jalgaon News : जिल्ह्यातील सहा कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे निकाल आज जाहीर झाले. त्यात पारोळ्यात शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील यांचा पराभव झाला, तेथे राष्ट्रवादीच्या डॉ. सतीश पाटील यांनी मुसंडी मारली. (Jalgaon Bazar Samiti Result Mahajan Chavan Savkare Choudhary won election news)
जामनेरमध्ये मंत्री गिरीश महाजन, भुसावळात भाजप आमदार संजय सावकारे, रावेरमध्ये कॉंग्रेसचे आमदार शिरीष चौधरी, चाळीसगावात भाजप आमदार संजय सावकारे यांनी आपले वर्चस्व कायम राखले आहे. चोपड्यात त्रिशंकू स्थिती आहे. भुसावळात राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनाही पराभव पत्करावा लागला आहे.
जळगाव जिल्ह्यातील बारा कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी (ता.२८) मतदान झाले, त्यातील सहा बाजार समितींची आज मतमोजणी झाली. उर्वरित सहांची उद्या होईल.
जामनेरात गिरीश महाजनांचे यश
जामनेर बाजार समितीत राज्याचे ग्रामविकास मंत्री व भाजप नेते आमदार गिरीश महाजन यांनी मोठे यश मिळविले आहे. त्यांनी बाजार समितीत आपली सत्ता कायम ठेवत सर्व अठरा जागेवर यश मिळविले आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना प्रणीत महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे. त्यांना एकाही जागेवर यश मिळालेले नाही.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
चिमणराव पाटील यांचा पराभव
पारोळा बाजार समितीत शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील यांची गेल्या बारा वर्षापासूनची सत्ता संपुष्टात आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार डॉ. सतीश पाटील यांनी मुसंडी मारली आहे, त्यांना पंधरा जागा मिळाल्या आहेत, आमदार पाटील यांच्या गटाला केवळ तीन जागा मिळाल्या आहेत,आमदार पाटील यांचे पुत्र व जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील पराभूत झाले.
चाळीसगावात चव्हाणांचे वर्चस्व
चाळीसगाव बाजार समितीत भारतीय जनता पक्षाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी सहकारात आपली ताकद पुन्हा एकदा दाखविली आहे. भाजप, शिंदे गट युतीला पंधरा तर महाविकास आघाडीला तीन जागा मिळाल्या आहेत.
रावेरमध्ये शिरीष चौधरींचाच दम
रावेर बाजार समितीत कॉंग्रेसचे आमदार शिरीष चौधरी यांनी आपली ताकद दाखवीत महाविकास आघाडीला यश मिळवून दिले आहे. महाविकास आघाडीला १३ जागा मिळाल्या आहेत, तर भाजप-शिंदे गटाला तीन व अपक्षांना दोन जागा मिळाल्या आहेत.
भुसावळात सावकारेंची मुसंडी
भुसावळ बाजार समिती मतदार संघात भारतीय जनता पक्षाचे आमदार संजय सावकारे यांनी आपली ताकद दाखवीत राष्ट्रवादी कांग्रेसचे आमदार एकनाथ खडसे व माजी आमदार संतोष चौधरी यांच्या गटाचा पराभव केला आहे. यात सावकारे यांच्या गटाला १५ तर महाविकास आघाडीला तीन जागा मिळाल्या आहेत.
चोपडयात त्रिशंकू स्थिती
चोपडा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत घनश्याम पाटील, संदीप पाटील यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस आघाडीला ५ आणि अरुणभाई गुजराथींच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस स्वतंत्र गटाला ४ तर शिवसेना शिंदे गटाच्या आमदार लताताई सोनवणे, कॉंग्रेसचे रोहित निकम व भाजपच्या गटाला तब्बल नऊ जागा मिळाल्या आहेत. सत्तेसाठी आणखी कोणती नवीन युती होईल याकडे लक्ष आहे.
सहा बाजार समितीचे आज निकाल
जिल्ह्यातील सहा बाजार समित्यांच्या निवडणुकीचे निकाल उद्या (ता. ३० ) लागणार आहेत. जळगाव, बोदवड, अमळनेर, यावल, पाचोरा व धरणगाव बाजार समित्यांची मतमोजणी सकाळी आठपासून सुरू होणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार एकनाथराव खडसे यांच्या वर्चस्वाचा निकाल लागणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.