गणपूर (ता. चोपडा) : खानदेशात ऊस लागवडीला या महिन्यापासून सुरुवात झाली आहे. स्थानिक स्वरूपातील बेणे वापर सुरू झाला आहे. त्याचप्रमाणे काही शेतकरी ऊसाची रोपे आणून त्याची लागवड करीत असल्याचे दिसून आले आहे. खानदेशात पांढऱ्या माशीचा उद्रेक पाहता गेल्या दोन वर्षांत उसाची लागवड कमालीची खाली आली. त्यातल्या त्यात चोपडा तालुक्यात हे प्रमाण निम्म्यावर आले आहे. अडावद, मंगरूळ व गलंगी, गणपूर गटात लागवड २० टक्क्यांवर आली आहे. (beginning of sugarcane cultivation in Khandesh will be close to farmers till end of January )