भुसावळ : शहरासह तालुक्यात दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने दमदार हजेरी लावली. विजांच्या कडकडाटांसह सोमवारी (ता. २) पहाटेपासून जोरदार पावसाला सुरवात झाली. त्यामुळे बोदवड तालुक्यातील उजनी उगमस्थान असलेल्या भोगावती नदीला पहिल्यांदाच पूर आला. त्यामुळे नदीकाठावरील ५० ते ६० घरांमध्ये आणि २० ते २२ दुकानांमध्ये पाणी शिरले होते. सकाळपासून नदी काठावरील रस्ते पाण्याखाली गेले. जीवितहानी टळली आहे. (Bhogavati River of Varangaon flooded)