Bhusawal Assembly Constituency : एकदा उमेदवारी जाहीर झाल्यावर राजकारणात डावपेच आखावे लागतात, ते रक्षा खडसे यांच्यासाठी भाजप व महायुतीने आखले होते. सर्व प्रथम नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा राबविली. सुरवातीला एकतर्फी वाटणारी निवडणूक शेवटच्या टप्प्यात अटीतटीची वाटत असताना, संभाव्य धोका ओळखून भाजप वेळीच सावध झाल्याने रक्षा खडसे यांचे मताधिक्य घटण्याचा धोका टळला व ते अबाधित राहिले. ()
आमदार संजय सावकारे यांच्या नेतृत्वाखाली सूक्ष्म नियोजन केले होते. साधारणपणे निवडणुकीच्या महिनाभर आधीच महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. त्यानंतर ग्रामीण व शहरी भागात विविध टप्प्यांत प्रचार केला. जवळपास ही निवडणूक एकतर्फी होणार, असे वाटत असतानाच ‘मविआ’चे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली. शरद पवार यांची जाहीर सभा झाली नाही, तरी आघाडीचा त्यांनी घेतलेला कार्यकर्ता मेळावा उर्जा देऊन गेला.
शिवाय माजी आमदार संतोष चौधरी प्रचारात सक्रिय झाले. प्रचार संपायला फक्त चार दिवस बाकी असतानाच सावकारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतली. शिवाय भाजपच्या पक्षफोडीच्या राजकारणामुळे बुद्धिजीवी वर्ग नाराज आहे, तो मतदानासाठी बाहेर पडणार नाही, असे वाटल्यामुळेच कदाचित माजी खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांचे ‘अमृत काळातील भारत’ यावर मार्गदर्शन ठेवले होते.
अर्थातच ते राजकीय असू नये, म्हणून उत्तिष्ठ भारत ही संस्था आयोजक होती. यात श्रोते होते शिक्षक, प्राध्यापक व इतर व्यावसायिक. या मुक्त संवाद कार्यक्रमातून बऱ्यापैकी ‘ब्रेन वॉशिंग’ करण्याचा प्रयत्न झाला. गेल्या वेळेपेक्षा मतदान दोन टक्क्यांनी वाढले. रक्षा खडसे यांना भुसावळ विधानसभा मतदारसंघातून ९५ हजार १९२ मते मिळाली. गेल्या वेळेपेक्षा २०२ मते कमी मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी श्रीराम पाटील यांना ५३ हजार ७३२ मते मिळाली. (latest marathi news)
म्हणजे खडसे यांना ४१ हजार ४६० इतके मताधिक्य मिळाले. मागील निवडणुकीत ५० हजार ८८८ इतके मताधिक्य मिळाले होते. ते ९ हजार ४२८ मतांनी कमी झाले. याबाबत ‘सकाळ’ने व्यक्त केलेला अंदाज खरा ठरला. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इंजिनिअर संजय ब्राह्मणे यांना आठ हजार ७८० मते मिळाली. ॲड. प्रकाश आंबेडकर यांची सभा होऊनही मते कमी मिळाली.
मागील निवडणुकीत ‘वंचित’च्या उमेदवारास सुमारे १५ हजारांपेक्षा जास्त मते मिळाली होती. अपक्ष उमेदवार एकनाथ साळुंके यांना पाच हजार ३१३ मते मिळाली. श्रीराम पाटील नावाच्या इतर दोन उमेदवारांना अनुक्रमे ५७० व ९१ मते मिळाली, तर शेख बशीर यांनाही केवळ ८१ मते मिळाली. यावरून मतदारांनी अतिशय विचारपूर्वक मतदान केल्याचे दिसून येते.
भाजपची टीम वेळीच सावध झाली नसती, तर मताधिक्य आणखी घटले असते. महायुतीच्या इतर घटक पक्षांची रक्षा खडसे यांना साथ मिळाली. शिवाय सासरे एकनाथ खडसे यांनी पडद्यामागून जी सूत्रे हलवली, त्याचाही उपयोग झाला. विशेषतः मुस्लिम वस्तीत इफ्तार पार्टीनिमित्त आपल्या विश्वासू सहकाऱ्यांना दिलेल्या टीप्स कामी आल्या असाव्यात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.