Jalgaon News : भुसावळ रेल्वेने एका दिवसात मिळविले साडेतीन कोटीचे उत्पन्न!

Jalgaon News : भुसावळ रेल्वे विभागाने आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये एका दिवसात माल वाहतुकीतून सर्वाधिक महसूलचा विक्रम केला.
Bhusawal Railway Station
Bhusawal Railway Stationesakal
Updated on

जळगाव : भुसावळ रेल्वे विभागाने आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये एका दिवसात माल वाहतुकीतून सर्वाधिक महसूलचा विक्रम केला. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने १२ मार्चला तीन कोटी ५९ लाख किमतीची माल वाहतूक केली आहे. जे चालू आर्थिक वर्ष २०२३-२०२४ मध्ये एका दिवसात सर्वाधिक आहे. आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट माल वाहतूक आहे. (Jalgaon Bhusawal Railway income marathi news)

भुसावळ विभागात २४ गुड्स शेड आणि १२ साइडिंग आहेत. जिथून भारताच्या सर्व भागांमध्ये अनेक माल लोड केला जातो. नाशिक, जळगाव, धुळे, बुलढाणा, अकोला, अमरावती आणि खंडवा जिल्ह्यांत पसरलेल्या गुड्स शेड्समधून पेट्रोलियम, डी-ऑइल्ड केक्स, कांदा, गहू, मका आदी वस्तू लोड केल्या जातात. गेल्या काही वर्षांत भुसावळ विभाग नाशिक शहरातून ऑटोमोबाईल लोडिंगला आकर्षित करण्यात यशस्वी झाला आहे.

बारा मार्चला एकूण ३२ हजार १०१ टन विविध माल ५१७ वॅगनमध्ये ११.५ रेकच्या समप्रमाणात लोड केल्या गेल्या. या दिवशी विभागाला एकूण ३ कोटी ५९ लाखा रुपयाचा महसूल माल वाहतुकीतून प्राप्त झाला. ५१७ वॅगनपैकी मनमाड येथील भारत पेट्रोलियम डेपोमधून १५० वॅगन्स पेट्रोलियमने लोड करण्यात आले. (latest marathi news)

Bhusawal Railway Station
Jalgaon Adivasi Bhongrya Fest: ‘आमरू होली आयो रे’; ‘भोंगऱ्या’चा बेधुंद उत्साह! उनपदेव, पाल येथे रंगीबेरंगी पोषाखासह आदिवासी नृत्य

पारस थर्मल स्टेशनवरून १६६ वॅगन कोळशाचे, लासलगाव आणि मनमाड येथून ६९ वॅगन कांद्याचे, ४९ वॅगन ऑटोमोबाईल, ४२ वॅगन खंडवा येथून गहू, ओरिएंट सिमेंट कारखाना जळगाव येथून २१ वॅगन आणि चाळीसगाव येथून २० वॅगन चारा. अशा प्रकारे एकूण ५१७ वॅगन लोड करण्यात आले.

Bhusawal Railway Station
Jalgaon News : पिंपरखेड-चाळीसगाव रेल्वे मार्गावर तिसरी लाइन सुरू! प्रतितास 120 किलोमीटर गतीने चाचणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.