Jalgaon News : भुसावळला भुयारी गटार प्रकल्प अखेर मार्गी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत 82 कोटींच्या कामांना तांत्रिक मंजुरी

Jalgaon News : वरणगाव शहरातील नगरपालिकेच्या भुयारी गटारी योजनेच्या ८२ कोटींच्या प्रकल्पाच्या कामाला अखेर मंत्रिमंडळाच्या बैठकीत तांत्रिक मंजुरी मिळाली आहे.
Fund
Fund esakal
Updated on

वरणगाव/भुसावळ : वरणगाव शहरातील नगरपालिकेच्या भुयारी गटारी योजनेच्या ८२ कोटींच्या प्रकल्पाच्या कामाला अखेर मंत्रिमंडळाच्या बैठकीत तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पात शहरातील मैलामिश्रित सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते शुद्ध केले जाणार आहे. या शुद्ध केलेला पाण्याचा वापर शेतीसाठी होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. शहरात तत्कालीन ग्रामपंचायतच्या कार्यकाळात (स्व.) रोहिणी जावळे सरपंच असताना मलमिश्रित सांडपाण्याचा दोन ते अडीच कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर होऊन बांधकामाला सुरवात झाली होती. (Bhusawal Underground Sewer Project Finally Technical Approval for 82 Crore Works in Cabinet Meeting )

मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे हा प्रकल्प अर्धवट पडून आहे. शहरांतील मलमिश्रीत आणि सांडपाण्याचा सर्वस्वी विषय लक्षात घेता आमदार संजय सावकारे यांनी बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी वरणगाव पालिकेचे मुख्याधिकारी यांच्यामार्फत कागदपत्रांची पूर्तता करून मंत्रालयात पाठपुरावा सुरू असताना अखेर (ता. ४) मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विषयाला ८२ कोटी ५७ लाख ९९ हजार ५६० रुपयांच्या प्रकल्पाला तांत्रिक मंजुरी देण्यात आली आहे.

मध्यवर्ती शहरासाठी ही योजना महत्त्वपूर्ण असून प्रकल्पाची शासन निर्णयानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे तांत्रिक तपासणी देय प्रकल्प मंजूर रकमेच्या एक टक्का रक्कम म्हणजेच वरणगाव पालिकेने ८२ लाख रुपये देणे बंधनकारक आहे. त्यानंतर प्रकल्पाचे काम सुरू होऊ शकेल. शहरातील भुयारी गटार योजना कार्यान्वित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भुयारी गटार योजनेंतर्गत स्मशानभूमी मागील भोगावती नदीपात्राला लागून प्रकल्पाचे नियोजन आहे. (latest marathi news)

Fund
Jalgaon News : गणेशवाडी परिसरात महिलेचा निर्घृण खून

प्रकल्पातून शहरातील सांडपाणी वाहून नेत पंपिंग स्टेशनजवळ जमा केले जाणार आहे. या ठिकाणाहून अशुद्ध पाणी पॉवर पंपाद्वारे एमएलटी प्लॅटमध्ये सोडले जाईल. तेथे त्यावर प्रक्रिया होईल. त्यानंतर शुद्ध केलेले हे पाणी वापरासाठी देण्यात येणार आहे. ही योजना कार्यान्वित होणार असल्याची माहिती आमदार संजय सावकारे यांनी दिली. या योजनेमुळे शहरातील महत्त्वाचा मैलामिश्रित सांडपाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागणार आहे.

''वरणगाव शहरातील महत्त्वाकांक्षी भुयारी गटार योजनेंतर्गत पंपिंग स्टेशन व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे काम मार्गी लागावे, यासाठी प्रयत्न केले. प्रत्यक्षात या कामाला तांत्रिक मंजुरी मिळाली असून, हे काम पूर्णत्वाकडे जात आहे. लवकरच हा प्रकल्प सुरू होणार आहे. शहरातील भोगावती नदीमध्ये सोडलेले दूषित पाणी आता पाइपलाइनद्वारे थेट सांडपाणी प्रक्रिया केंद्रामध्ये जाणार आहे. त्यावर प्रक्रिया होऊन हे पाणी शुद्ध केले जाणार आहे, त्याचा उपयोग शेतकऱ्यांना होणार आहे.''- संजय सावकारे, आमदार

Fund
Jalgaon News : मुक्ताईनगर रुग्णालयात निकृष्ट दर्जाच्या औषधी गोळ्या; रोहिणी खडसेंकडून तपासणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.