जळगाव : राष्ट्रीय महामार्गावर नशिराबाद उड्डाणपुलावर मागून भरधाव आलेल्या वाहनाने दुचाकीला धडक दिली. त्यात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना रविवारी (ता.५) दुपारी घडली. माहिती मिळताच नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. कुटूंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. दीपक कडू सूर्यवंशी (वय ४५, रा. नशिराबाद) असे मृताचे नाव आहे. दीपक हे पत्नी व दोन मुलींसह नशिराबादला वास्तव्यास होते. (Bike rider killed in collision with unknown vehicle Accident at Nasirabad flyover )
नशिराबाद गावातील पार्वती मेडीकलवर काम करून आपला उदरनिर्वाह करीत होते. रविवारी दीपक दुचाकीने भुसावळकडून नशिराबाद येथे येत असताना दुपारी दीडच्या सुमारास मागून भरधाव आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात दीपकच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. दीपक यांना तपासणीअंती शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषीत केले. त्यांच्या पश्चात पत्नी जयश्री व दोन लहान मुली आहेत. याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
महामार्गाबाबत प्रचंड भीती
खान्देशातील एैतिहासीक गाव म्हणून ओळख असलेल्या नशिराबाद गावातून राष्ट्रीय महामार्ग जातो. या महामार्गाने आजवर अनेकांचे जीव घेतले आहेत. एरंडोलकडे एकलग्न गावातून वळण घेणारा महामार्ग व नशिराबाद गावातून तशाच पद्धतीने महामार्गावर वळण असून, दोन्ही गावे अपघातप्रणव झालेली आहेत. नेहमीच या गावांजवळ कुठल्याही वाहनांचे अपघात घडतात.
राष्ट्रीय महामार्गावर या दोन्ही गावांजवळ सुरक्षात्मक उपाययोजनेसह वाहनांची वेगमर्यादा निश्चीत करावी, अशी मागणी वेळोवेळी ग्रामस्थांकडून होते. नशिराबाद गावाजवळच दोन दिवसांपूर्वी अब्दुल हमीद शेख ईस्माईल (वय ६९, रा. नशिराबाद) या ग्रामस्थाचा मृत्यू झाला. लगेच आज रविवारी दीपक सूर्यवंशी यांचा गावाजवळच अपघाती मृत्यू झाल्याने ग्रामस्थांमध्ये महामार्गाबाबत प्रचंड भीती वाढली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.