Jalgaon News: बोदवड तालुक्यात वादळात केळीबागा उद्धवस्त! आचारसंहिता शिथिल करून भरपाई द्यावी : रोहिणी खडसे

Jalgaon News : आचारसंहिता शिथिल करून केळी उत्पादकांना तत्काळ भरपाई द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष ॲड. रोहिणी खडसे-खेवलकर यांनी केली आहे.
Banana orchards were damaged due to stormy rains in the taluk on Saturday. A pair of bullocks also died due to leaves falling on the manger. Rohini Khadse-Khewalkar while inspecting the place.
Banana orchards were damaged due to stormy rains in the taluk on Saturday. A pair of bullocks also died due to leaves falling on the manger. Rohini Khadse-Khewalkar while inspecting the place.esakal
Updated on

बोदवड : कडक उन्हामुळे तापमान ४५ अंशांवर गेल्याने केळीबागांचे नुकसान झाले असून, शनिवारी (ता. २५) वादळी पावसाने परिसरातील केळीबागा अक्षरश: उद्धवस्त झाल्या आहेत. त्यामुळे आचारसंहिता शिथिल करून केळी उत्पादकांना तत्काळ भरपाई द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष ॲड. रोहिणी खडसे-खेवलकर यांनी केली आहे. (Jalgaon Bodwad taluka banana plantations destroyed in storm)

तापमान ४५ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचल्याने सर्व जण उष्णतेत होरपळत असताना, शनिवारी सायंकाळी मुक्ताईनगर, रावेर, बोदवड तालुक्यांत झालेल्या वादळी पावसाने केळीच्या बागा भुईसपाट झाल्या आहेत. शेती, घर व जनावरांच्या गोठ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

रविवारी (ता. २६) रोहिणी खडसे यांनी बोदवड तालुक्यातील शिरसाळा, चिचखेडासीम, लहान मनूर, ऐनगाव चिखली येथे नुकसानीची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकरी, नागरिकांना धीर दिला. नुकसानीचे पंचनामे करून नुकसानभरपाई मिळण्याबाबत प्रांताधिकारी, तहसीलदारांसोबत त्यांनी चर्चा केली. आचारसंहिता शिथिल करून नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचे राेहिणी खडसे यांनी सांगितले. (latest marathi news)

Banana orchards were damaged due to stormy rains in the taluk on Saturday. A pair of bullocks also died due to leaves falling on the manger. Rohini Khadse-Khewalkar while inspecting the place.
Jalgaon News: खते, बियाणे वाजवी दरात न मिळाल्यास लावा फोन! कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना आवाहन; तक्रार निवारण कक्ष सुरू

रामदास पाटील, कैलास चौधरी, चिचखेडासीमचे सरपंच पांडुरंग पाटील, सुभाष पाटील, विनोद कोळी, रामराव पाटील, किरण वंजारी, श्‍याम सोनवणे, नईम बागवान, अतुल पाटील, दिलीप पाटिल, शिरसाळ्याचे सरपंच शांताराम बोरसे, प्रवीण पाटील, अमोल बोरसे, प्रकाश पाटील, मनूरचे सरपंच अमोल हळपे, सुरेश धनगर, चिखलीचे सरपंच धनराज पाटील, अमोल सोनवणे, विकास पाटील, प्रकाश वाघ, लीना वाघ आदी या वेळी उपस्थित होते.

Banana orchards were damaged due to stormy rains in the taluk on Saturday. A pair of bullocks also died due to leaves falling on the manger. Rohini Khadse-Khewalkar while inspecting the place.
Jalgaon News : जिल्हा दुष्काळसदृश्‍य दाखविल्याने होरपळ : उन्मेश पाटील; जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांनी राजीनामा द्यावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.