Jalgaon Cotton : बोदवड तालुक्यात शिवारात कपाशीवर रोगाचा प्रादुर्भाव; शेतकरी संकटात

Jalgaon Cotton : शेतात पाणी साचून काढणीला आलेल्या मक्याच्या कणसांना कोंब आल्याने बहुतांश भागातील पिके वाया गेली आहेत तर काही ठिकाणी उत्पादनात घट येणार आहे.
Stunted plants due to disease attack on cotton in the field. Corn kernels sprouts.
Stunted plants due to disease attack on cotton in the field. Corn kernels sprouts.esakal
Updated on

जामठी (ता. बोदवड) : बोदवड तालुक्यात यंदा पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे शेतात पाणी साचून काढणीला आलेल्या मक्याच्या कणसांना कोंब आल्याने बहुतांश भागातील पिके वाया गेली आहेत तर काही ठिकाणी उत्पादनात घट येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. शेतकऱ्यांनी कर्ज काढून बी-बियाणे खरेदी करून पेरणी केली. पेरणीही चांगली झाली. मका व कपाशीचे पिकही चांगले बहरले. (Bodwad taluka farmers are in trouble due to disease outbreak on cotton )

मात्र सततच्या पावसामुळे मक्याच्या कणसांना कोंब आले असून, कपाशीवर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी राजा हवालदिल झाला आहे. त्यामुळे आता जगावे कसे? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. तालुक्यात जून ते सप्टेंबरपर्यंत पडत असलेल्या जोरदार पावसामुळे खरिपातील काढणीला आलेल्या मका, कपाशी, सोयाबीन, मूग, उडीद पिकांचे अतोनात नुकसान होत आले आहेच; पण जोरदार झालेल्या पावसाने शेतातील पाण्याचा निचरा न झाल्याने कपाशी व मका पिकांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. पावसाचे पाणी शेतात साचल्याने कपाशी पिकांवर बुरशी रोगाचा प्रादुर्भाव अधिक झाल्याने उत्पादन घटणार असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. (latest marathi news)

Stunted plants due to disease attack on cotton in the field. Corn kernels sprouts.
Jalgaon Cotton Crop : कासोदा परिसरात पीक परिस्थिती उत्तम; जोरदार पावसाची अपेक्षा

पिकविम्यापासून शेतकरी वंचित

शासनाने शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री विमा योजनेच्या माध्यमातून एक रुपयात विमा काढून दिला असला तरी बोदवड तालुक्यातील शेतकरी भरपाईपासून वंचित असल्याचे चित्र आहे. सन २०२३-२४ मध्ये खरीप व रब्बी हंगामात सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. बऱ्याचशा शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे नुकसानीसंदर्भात ऑनलाइन तक्रारही केल्या. ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीच्या प्रतिनिधींनी नुकसानीचे पंचनामेही केले. मात्र बरेचशे शेतकरी अजूनही पिकविम्यापासून वंचित आहेत. या संदर्भात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आबासाहेब पाटील यांचा शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा सुरू असून, शेतकऱ्यांना शासनाने त्वरित पिकविमा वितरीत करण्याची मागणी आबा पाटील यांनी केली आहे.

Stunted plants due to disease attack on cotton in the field. Corn kernels sprouts.
Jalgaon Cotton News : जुन्या कापसाला 8000 रुपये भाव; धरणगावात पहिल्याच दिवशी अडीच हजार क्विंटल खरेदी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.