Jalgaon Cotton Crop Crisis: सावधान, कपाशीवर येतेय बोंडअळी! खबरदारीच्या उपायांकडे कानाडोळा; वरिष्ठ शास्त्रज्ञांकडून पिकाची पाहणी

Jalgaon News : खानदेशात दरवर्षी मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड होते. विशेष म्हणजे खरीपपूर्व लागवडीचे क्षेत्रही खूप मोठे आहे.
While inspecting the cotton crop and guiding the farmers, Dr. B. D. jade
While inspecting the cotton crop and guiding the farmers, Dr. B. D. jadeesakal
Updated on

गणपूर (ता. चोपडा) : खानदेशात यावर्षी मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आलेल्या कपाशीवर गुलाबी बोंडअळीची सुरवात दिसून आली आहे. मात्र, अजूनही शेतकऱ्यांनी कुठलीच उपाययोजना केली नसल्याने हा धोका वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खानदेशात दरवर्षी मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड होते. विशेष म्हणजे खरीपपूर्व लागवडीचे क्षेत्रही खूप मोठे आहे. (bollworm coming on cotton heed to precautionary measures)

खानदेशात सुमारे पाच ते सहा लाख हेक्टर क्षेत्रावर कपाशी लागवड होते. त्यापैकी सुमारे ३० टक्के कपाशी खरीपपूर्व हंगामात लागते. कृषी विभागाच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करून अठरा मेपासूनच पाणी उपलब्ध असलेल्या तालुक्यांत बीटी कपाशीची लागवड झाली. तेव्हापासून सुरू झालेली लागवड जुलै मध्यापर्यंत टिकते.

त्यामुळे कपाशी लागवडीचा काळ खूप मोठा होतो. सध्यास्थितीचा विचार करता खरीपपूर्व कपाशी ७० दिवसांची झाली आहे. या कपाशीला सततच्या पावसामुळे पहिल्या फवारणीची वेळसुद्धा निघून गेली आहे. अर्थात पाऊस सुरू असल्याने कीटकनाशकाची एक फवारणी वाचली असली तरीसुद्धा बोंडअळीसाठी कुठल्याच खबरदारीचे उपाय आजपर्यंत झाल्याचे खानदेशात फेरफटका मारला असता दिसून येत नाही.

त्यासाठी खबरदारी घेण्याची नितांत गरज आहे. गेल्यावर्षी कपाशीच्या पिकात बोंडअळी वाढल्यामुळे खानदेशात एकरी सरासरी चार ते पाच क्विंटल उत्पादन बहुतांश शेतकऱ्यांना आले. त्यामुळे हे पीक न परवडल्याने शेतकरी यावर्षी मका पिकाकडे वळले. त्याचे लागवड क्षेत्र वाढल्याचे दिसून येते. (latest marathi news)

While inspecting the cotton crop and guiding the farmers, Dr. B. D. jade
Jalgaon: योजनांचा गाजावाजा मात्र, लाडकी बहीण असुरक्षित : वर्षा पाटील; अत्याचाराविरोधात NCP शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आक्रमक

मात्र. कपाशीची लागवड करण्यात आलेली आहे, त्या सर्वच भागत बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यासाठी कृषी विभाग व शेतकऱ्यांनी संयुक्तरीत्या प्रयत्न करून बोंडअळीला अटकाव करणे गरजेचे आहे. कपाशीच्या पिकात बऱ्याच भागात बोंडअळीचा शिरकाव झाला आहे.

काही ठिकाणी डोमकळी तज्ज्ञांच्या निदर्शनास आली आहे. खानदेशात सर्वत्र हा धोका वाढला आहे. कपाशीच्या पिकात फेरोमन ट्रॅप लावणे व खबरदारी म्हणून कृषी विभागाचे मार्गदर्शन घेण्याची गरज वाढली आहे. जिल्ह्यात सोनाळा, पाळधी, पहुर, शिरसोली व लगतच्या पट्ट्यात बोंडअळीची सुरुवात झाल्याचे आढळून आले आहे.

"नुकतीच बीटी कपाशीची पहूर, पाळधी भागात पाहणी केली असता, ३४ ते १० दिवसाच्या पिकात गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावाची शक्यता वाढल्याचे दिसून आले आहे. मात्र, शेतकऱ्यांत त्याबाबत अजूनही गांभीर्य दिसून येत नाही. त्यामुळे एकरी पाच फेरोमोन ट्रॅप लावणे, बोन्डअळीचे लाईफ सायकल ब्रेक करणे गरजेचे आहे. सर्व शेतकऱ्यांनी ही बाब गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे."

- डॉ. बी. डी. जडे, वरिष्ठ शास्त्रज्ञ, जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड, जळगाव.

While inspecting the cotton crop and guiding the farmers, Dr. B. D. jade
Jalgaon Maize Crop Crisis: मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव! शेतकरी संकटात; कृषी विभागाकडून शेतात जाऊन मार्गदर्शन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.