Jalgaon News : बापरे... जिल्हाधिकारी कार्यालयात सापडला बॉम्ब! पाचच मिनिटात कार्यालय रिकामे; शेवटी कळले होते मॉकड्रील

Jalgaon News : बॉम्ब पथक व पोलिस येतात. सर्व अधिकारी त्यांच्या पद्धतीने कार्य करतात. शेवटी कळते बॉम्ब सापडल्यानंतर काय करावे, याचे मॉकड्रील होते अन्‌ सर्वच जण सुटकेचा श्‍वास सोडतात.
Bomb squad personnel defuse a bomb-like object. Officers and employees gathered in the premises of the collector's office.
Bomb squad personnel defuse a bomb-like object. Officers and employees gathered in the premises of the collector's office.esakal
Updated on

Jalgaon News : दुपारी चारची वेळ, जिल्हाधिकारी कार्यालयात अग्निशमन आणि बॉम्बसदृश बेवारस वस्तू असल्याचा मेसेज येतो अन्‌ काही मिनिटातच जीव मुठीत घेऊन सर्व कार्यालय रिकामे होते. एकच कल्लोळ, धाकधूक, कसा असेल बॉम्ब, कोणी ठेवला असेल, आता काय होणार? पोलिसांसह बॉम्बशोधक पथकाला कळविले जाते.

तोपर्यंत सर्व अधिकारी, कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आलेले असतात. बॉम्ब पथक व पोलिस येतात. सर्व अधिकारी त्यांच्या पद्धतीने कार्य करतात. शेवटी कळते बॉम्ब सापडल्यानंतर काय करावे, याचे मॉकड्रील होते अन्‌ सर्वच जण सुटकेचा श्‍वास सोडतात. (bomb found in collector office Mockdrill)

राज्यात सध्या महसूल पंधरवडा साजरा होत आहे. त्यानिमित्त मंगळवारी (ता. ६) दुपारी चारला जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापनांतर्गत अग्निशमन आणि बॉम्बसदृश्‍य वस्तू आढळल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत तत्काळ रिकामी करण्याबाबत मॉकड्रील झाले.

दुपारी चारला जिल्हाधिकारी कार्यालयातील दुसऱ्या मजल्यावर जाण्याच्या लाकडी जिन्याखाली बेवारस लेदर बॅग आढळून आली. सुरक्षिततेचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे बॉम्बशोधक व नाशक पथक, पोलिस अधीक्षक कार्यालय, महापालिकेचे अग्निशमन दल, जिल्हा शल्यचिकित्सक, १०८ रुग्णवाहिका, आपदामित्र पथकाला जिल्हाधिकारी कार्यालयात हजर राहण्यासाठी कळविण्यात आले.

यादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुरक्षित जागेत एकत्रित करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांना आपत्कालीन लोखंडी जिन्याचा वापर करून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले. त्यानंतर बॉम्बशोध व नाशक पथक, पोलिस अधिकारी व त्यांचे पथक चार वाजून १८ मिनिटांनी हजर झाले. त्यांनी लेदर बॅग शोधून ताब्यात घेतली व त्यात बॉम्ब नसल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना दिली. (latest marathi news)

Bomb squad personnel defuse a bomb-like object. Officers and employees gathered in the premises of the collector's office.
Marathwada: सरपंचालाच चिखलात बसून आंदोलन करण्याची वेळ, वाचा नक्की काय आहे प्रकरण

नियोजन भवनाशेजारी कचरा पेटीला लागलेल्या आगीवर अग्निशमन दलाने नियंत्रण मिळविले. मॉकड्रील यशस्वी पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकारी प्रसाद यांनी मॉकड्रीलमध्ये झालेल्या नियोजनातील त्रुटींबाबत सुधारणा करण्याबाबत सर्व विभागांना निर्देश दिले. अशाप्रकारचे मॉकड्रील रेल्वेस्थानक, बसस्थानक, शॉपींग मॉल, विमानतळ याठिकाणी करताना आपत्ती व्यवस्थापनांतर्गत मॉकड्रीलचे सर्व नियम पाळून शिस्तबद्ध मॉकड्रील करण्याचे आदेश दिले.

अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे, उपजिल्हाधिकारी (महसूल) विजयकुमार ढगे, जिल्हा पुरवठा अधिकारी संजय गायकवाड, नायब तहसीलदार (महसू) रूपाली काळे उपस्थित होत्या.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्नरवीरसिंह रावळ, बॉम्बशोध व नाशक पथकाचे पोलिस निरीक्षक अमोल कावडे, अग्निशमन दलाचे अधिकारी शशिकांत बारी, डॉ. आकीब शहा व आपदा मित्र सतीश कांबळे, योगेश गालफाडे, जगदीश बैरागी, राजेश सोनवणे, होमगार्ड मनोहर भोई, तुषार नेवे, शिवा कळसकर यांनी सहकार्य केले.

Bomb squad personnel defuse a bomb-like object. Officers and employees gathered in the premises of the collector's office.
ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका पुढे ढकलल्या जाणार? बड्या नेत्याने सांगितलं कारण, चर्चांना उधाण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.